राज्यात स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय सुरू करण्याची मागणी
बीड (रिपोर्टर) महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेचा समावेश करण्यात यावा, महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये मुख्य शाखा कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषयाचा समावेश करण्यात यावा, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.










