Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडवडवणी एपीआयने विचारला न्यायालयाला जाब, सुडबुद्धीने वागता, तुमच्यावर गुन्हा का दाखल करू...

वडवणी एपीआयने विचारला न्यायालयाला जाब, सुडबुद्धीने वागता, तुमच्यावर गुन्हा का दाखल करू नये, एपीआय मिरकरांना एसपींनी बोलावलं


सोशल मिडियावर पत्र व्हायरल
बीड/वडवणी (रिपोर्टर)- आपण लोकसेवक आहात, आपलं आचरण कायद्याला धरून असावं, तुम्ही जाणीवपुर्वक सुडबुद्धीने वागत आहात, आम्हास नुकसान व्हावे, या उद्देशाने कायदेशीर अधिकार आमच्याविरुद्ध वापरत आहात, आम्हाला नुकसान पोहचविण्यासाठी आम्हाला धाक दाखवत आहात त्यामुळे आपल्या विरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, असे थेट पत्र वडवणीच्या न्यायदंडाधिकार्‍यांना येथील सहायक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी पाठवले. ते पत्र गेल्या तीन दिवसांपासून सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून फौजदाराने न्यायाधिशांना गुन्हा दाखल करण्याबाबतच्या या पत्राने सोशल मिडियावर प्रचंड चर्चा घडवून आणली असून जिल्हा पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी या प्रकरणाची दखल घेत सहायक पोलीस निरीक्षक मिरकर यांना जाब विचारण्यासाठी कार्यालयात बोलवल्याचे वृत्त आहे. मिरकर यांनी मात्र हे पत्र आपले नसल्याचे सांगितले. परंतु त्यावर वडवणी पोलिसांचा सही आणि शिक्का आहे.

258092046 1760346414175241 7666467058075820458 n
259502852 1281138832402103 8135442749551187466 n
सोशल मिडियावर पत्र व्हायरल


याबाबत अधिक असे की, सदरील पत्र हे दोन दिवसापासून फिरत असल्याची कबुली देखील एपीआय मिरकर यांनी दिली आहे.हे पत्र एपीआय मिरकर यांनी उपविभागीय पोलीस आधिकारी माजलगांव यांच्या मार्फत मा.न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायलय वडवणी यांना दि.17/11/2021 यादिवशीची तारीख असल्याच पत्रावर नमूद आहे.यामध्ये 1.लोकसेवक असुन स्वतः कशाप्रकारे आचरण करावे याबाबत कायद्यामधील तरतुदीची माहीती असताना जाणीवपूर्वक आम्हास नुकासान व्हावे या उद्देशाने कायद्याची अवज्ञा केल्याचे दिसुन आले आहे.2.आम्हास नुसान पोहोचविण्याचे उद्देशाने आपण लोकसेवक असतानाही चुकीचे दस्तऐवज तयार केले आहात,3.आपण लोकसेवक असुनही मा. पोलीस अधीक्षक, बीड यांना जाणीवपूर्वक खोटी माहीती खरी आहे म्हणुन पूरविली आहात.4.आपण आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करुन आम्हास नुकसान व्हावे या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक बीड यांना खोटी माहीती पूरविली आहात.


5.अशा प्रकारे आम्ही लोकसेवक असतानाही वरिल प्रमाणे आम्हास नुकसान पोहोचविण्याचा धाक देवून आपण भा.द.वि कलम 166,167,177,182(ब) व 189 चे उल्लंघन केल्याचे दिसुन आले अशी आमची धारणा असुन सदर बाबत आपणावर गुन्हा का नोंदविण्यात येवु नये याबाबत आम्हास कळवावे अशी विनंती देखील केली यात केली आहे. सदरचे पत्र हे दोन दिवसांपासून सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून या पत्राची सर्वत्र चर्चा होत आहे.


रिपोर्टरशी एपीआय मिरकर म्हणाले कि….
सदरील पत्र रिपोर्टरच्याहाती लागल्यानंतर रिपोर्टरने एपीआय नितीन मिररकर यांच्याशी भेट घेऊन याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की,हे पत्र सोशल मीडियावर दोन दिवसापासून व्हायरल होत असून याबाबत मला काही एक माहिती नाही. हे पत्र खोटे असून याची नोंद ठाण्यातील नोंद रजिस्टरला नाही ते तुम्ही तपासू शकता तसेच ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा घडला होता.तो गुन्हा फेक होता अस म्हणत याबाबत मला आज एसपी साहेबांनी बोलवले आहे असे सांगितले आहे.

पत्र कोणा मार्फत
सदरचे पत्र हे माननिय उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग माजलगाव यांच्यामार्फत पाठवल्याचा उल्लेख त्यावर आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!