जलजीवन आणि रस्त्यांच्या साडेचार कोटी रूपयांच्या कामाचे उद्घाटन व लोकार्पण
बीड (रिपोर्टर) ग्रामीण भागातील महिला व माता भगिणींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा कायमस्वरूपी हटवण्याचा मानस तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राबविला होता व या करिता हर घर जल, जलजीवन मिशन या योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 55 लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी नळाद्वारे पुरविण्याचा मानस महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. तर रस्ते अभावी शेतकरी बांधवांचे होत असलेले नुकसान ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देवून शेतकरी बांधवांची रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा हा महत्त्वपुर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. तत्कालीन पाठपुरावा करून पिण्याचे पाणी व रस्त्यासाठी साडे चार कोटी रूपयांच्या योजना केवळ चौसाळा जि.प.गटासाठी मंजुर करून घेतली होती. या योजनेचे आज प्रत्यक्ष कामास सुरूवात आणि झालेल्या कामाचे लोकार्पण केले असून यामुळे समाधानी आहे असे वक्तव्य आ.संदीप क्षीरसागर यांनी आज गोगलवाडी, देविबाभुळगाव, जेबापिंप्री, हिंगणी खु., पालसिंगण येथील विकास कामाच्या उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी केले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता. यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन, रस्त्याच्या समस्यांसाठी 2515, जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत आणि जनसुविधा, आमदार फंडातून वीजेच्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बीड मतदार संघाला निधी खेचुन आणला आहे. पण काही प्रस्थापितांच्या खोड्यामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे बर्याच ठिकाणी विकास कामे रखडली होती. पण या बाबत प्रशासकीय अधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून समन्वयाने या बाबत तोडगा काढुन कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली आहे. आज गोगलवाडी ता.बीड येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना 35 लक्ष 27 हजार रू., 2515 अंतर्गत रस्ता सुधारणा करणे 5 लक्ष रूपयाचे, देविबाभुळगाव ता.बीड येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना 1 कोटी 17 लक्ष रू., जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत रस्ता सुधारणा करणे 20 लक्ष रू., जि.प.शाळा दुरूस्ती करणे 2 लक्ष रू., आमदार फंड 2021-22 अंतर्गत पोलसहित एलईडी लाईट बसवणे 7 लक्ष रू., जेबाप्रिंपी ता.बीड येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना 41 लक्ष रू., 2515 अंतर्गत सभागृह बांधकाम करणे 5 लक्ष रू., 2515 अंतर्गत खुली व्यायाम शाळा 5 लक्ष रू., जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभुमी बांधकाम करणे 5 लक्ष रू. हिंगणी खु. ता.बीड येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना 91 लक्ष रू., 2515 अंतर्गत सिमेंट रस्ता करणे 5 लक्ष रू., 2515 अंतर्गत खुली व्यायाम शाळा 5 लक्ष रू., 2515 अंतर्गत सभागृह बांधकाम करणे 3 लक्ष रू., जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभुमी सिमेंट रस्ता 5 लक्ष रू., पर्यटन विकास योजने अंतर्गत सिमेंट रस्ता 8 लक्ष व सभागृह 8 लक्ष, शाळा खोली बांधकाम करणे 8 लक्ष रू., पालसिंगण ता.बीड जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना 1 कोटी 6 लक्ष रू., 2515 अंतर्गत सिमेंट रस्ता करणे 10 लक्ष रूपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोगलवाडी, देविबाभुळगाव, जेबापिंप्री, पालसिंगण येथील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ, माताभगिणी, ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.