Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनात माणुसकी विसरू नका बाळा बांगर सॅल्युट!

कोरोनात माणुसकी विसरू नका बाळा बांगर सॅल्युट!


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचे महासंकट देशावर अजुही घोंगावत आहे. कोरोनाने अनेकांना गिळले, रोज कित्येक जण पॉझिटिव्ह निघतात. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो एकमेकांच्या सहवासात आल्यामुळे होतो. कोरोना हा संसर्ग आजार असला तरी माणसाने आपल्यातील माणुसकी कमी होवू देवू नये, काही जण कोरोना झालेल्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वेगळ्या नजरेने पाहतात हे काही माणुसकीचं लक्षण नाही, हे हैवानी लक्षण आहे. माणुस आणि माणुसकी आज जिवंत राहिली पाहिजे. कोरोनासारखे आजार येत असतात आणि जात असतात. त्यासाठी आपण आपली माणुकी सोडता कामा नये, कोरोनाच्या काळात अनेक समाजसेवक, राजकीय नेते,पत्रकार, कार्यकर्ते चांगले काम करतात त्यांना खरंच धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. काही जण कोरोनाने मरण पावलेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करतात, त्यांच्या धाडसाचे किती कौतुक करावे हेच कळत नाही. फेसबुकवर एक चांगला व्हिडीओ पाहण्यात आला. तो म्हणजे पाटोदा तालुक्यातील बाळा बांगर यांचा, बाळा बांगर हे सामाजीक कार्यकर्ते आहेत, ते आपल्या व्हिडीओमध्ये म्हणतात की, मी पाटोदा येथील कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. तेथे पाचंग्री येथील एक दाम्पत्य उपचार घेत होते. त्या दाम्त्याने मला सांगितले की, आम्ही नवरा बायको दोघेही पॉझिटिव्ह आलो आहोत. आमच्या मुली घरीच आहेत. त्यांची चाचणी करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. तुम्ही हे काम करु शकता हे आम्हाला माहित आहे. तेव्हा बाळा बांगर यांनी तात्काळ पाचंग्री येथे जावून त्या दोन मुलींना आपल्या सोबत गाडीत बसून आणलं आणि त्यांची चाचणी केली. खरं तर हे खुपच धक्कादायक आहे. ज्या दाम्पत्याच्या छोट्या मुली घरी आहेत. जे की, त्यांना काहीच कळत नाही. त्यांना कुणी पाहत नाही म्हणजे आपल्यातील माणुसकी संपुन आपण पाषाणी र्‍हदयाचे झालो की काय? पण बाळा बांगर सारखे लोक समाजात आहेत याचं समाधान वाटत आहे. अशा समाजसेवकांना खरचं सॅल्युट करायला हवं!!

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!