बीड (रिपोर्टर) बीड मतदार संघात आणि ग्रामीण भागात घराघरात शुद्ध व स्वच्छ जल देण्याचा मानस असून भविष्यात महिला भगिनीचे डोक्यावर पाण्याच्या हंडा दिसणार नाही असे वक्तव्य आ संदीप क्षीरसागर यांनी तीन कोटी 75 लक्ष रुपयाच्या विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकमत प्रसंगी व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की नाळवंडी येथे विकास कामांची गंगा जलजीवन योजने अंतर्गत संपूर्ण योजनेतंर्गत पाणी पुरवठा योजनेच्या 3 कोटी 75 लक्ष रुपये व घनकचरा व्यवस्थापन योजना-36 लक्ष 94 हजार रुपये विकास कामाचा आज शुभारंभ व लोकार्पण नाळवंडी ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आ संदीप क्षीरसागर मनाली की काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, घरकुल योजना, पथदिवे, अंतर्गत रस्ते नाल्या, शुद्ध पिण्याचे पाणी व विविध विकासात्यमक कामे पूर्ण झालेले आहेत. भविष्यात महिला भगिनीचे डोकं पाण्याचा हंडा दिसू नये हा माणूस असून विकास कामाच्या बाबतीत बीड मतदारसंघ कधीही मागे पडणार नाही यावेळी प्रमुख पाहुणे सह नाळवंडी सर्कल मधील माता भगिनी युवक युवती ज्येष्ठ नागरिकसह नाळवंडी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ, अनेक गावचे सरपंच, ग्रा.प. सदस्य, अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते