Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमधारूर शहरातील नगरसेवकाचे दुकान केले प्रशासनाने सिल

धारूर शहरातील नगरसेवकाचे दुकान केले प्रशासनाने सिल


आतील ग्राहकांच्या केल्या अँटीजन टेस्ट, सलून चालकाला
३००० रू दंड तर ज्वेलर्स चालकाला १००० रु दंड

किल्ले धारूर (रिपोर्टर)-धारूर शहरातील मेन रोड वरती असलेल्या एका नगरसेवकाच्या ज्वेलर्सच्या दुकानाला आज तहसील प्रशासन ,नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने ज्वेलर्सचे दुकान सील करून दंडात्मक कारवाई केली
आज दुपारी बारा वाजता मेन रोड वरती असलेल्या एका ज्वेलर्स चे दुकान उघडे असून आत मध्ये गिर्‍हाईक असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती यावरून तहसीलदार वंदना शिडोळकर व नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी ,नगरपरिषद नोडल अधिकारी सचिन डावकर ,अरुण वाघमारे , माणिक गायसमुद्रे पोलीस उपनिरीक्षक केदारनाथ पालवे यांनी पाहणी केली असता दुकान बाहेरुन बंद व आतून सूरू असल्याची दिसून आले अतील गिरहकाची अँटीजन चाचणी करण्यात आली ज्वेलर्स मालकाला१००० रुपये दंड लावण्यात आला आहे. यातून प्रशासनाचा भेदभाव दिसून येत आहे छोटे-मोठे व्यवसायिक व्यवसाय करताना सापडले तर त्यांना चक्क तीन हजार रुपये दंड लावला जातो तर मोठे ज्वेलर्स चालक यांना केवळ एक हजार रुपये दंड याबाबत मात्र धारूर शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!