Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईगेवराई तालुक्यातील वाळु माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आ. पवारांचे वाळु...

गेवराई तालुक्यातील वाळु माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आ. पवारांचे वाळु घाटावर स्पॉट पंचनामे


गेवराई (रिपोर्टर):- मी कुणाच्या रुपयाचा मिंदा नाही, मी मॅनेज होणाराही नाही. आता तालुक्यातली वाळू माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत आ. लक्ष्मण पवारांनी अवैध वाळू उपश्याविरोधात दंड थोपटत थेट गोदावरी पात्र गाठून सर्व वाळू घाटांची मोजणी करा, एका-एका ठेक्याला किती ब्रास वाळूची परवानगी आहे याची माहिती घ्या, आतापर्यंत किती उपसा झाला ते पहा. जास्त उपसा झाला असेल तर थेट कारवाई करत वाळू माफियांच्या मुसक्या बांधा. अशा सूचना आ. पवारांनी तहसीलदारांसह मंडल अधिकार्‍यांना देत वाळूची वाहतूक ट्रॅक्टरनेच झाली पाहिजे, त्याची अमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी त्यांनी केली.
गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपसा गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. मात्र महसूल विभागासह पोलीस आणि आरटीओ विभाागचे हात वाळू माफियांच्या घोंगडीखाली अडकल्याने याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. सदरचा प्रकार हा खपवून घेणार नसल्याचे सांगत आज आ. पवारांनी थेट वाळू घाट गाठले. अधिकार्‍यांसमवेत गोदा पात्रात जावून राक्षसभुवन, पांचाळेश्वर, सुरळेगाव या ठिकाणच्या वाळू घाटांचे स्पॉट पंचनामे केले. गोदामाय अक्षरश: छिन्न-विछिन्न केल्याचे दिसून आले. वाळू उपसा करणार्‍या ठेकेदारांनी अवैधपणे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केल्याने आ. पवारांनी तहसीलदारांना या प्रकरणात कारवाई करण्याच्या सूचना केल्या. मी कुणाच्या एका रुपयाचा मिंदा नसल्याचे सांगत तालुक्यातील वाळु माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. पर्यावरण आणि लोकांच्या हिताचे काम करण्यासाठी मी आमदार झाल्याचे सांगत प्रत्येक वाळु घाटाची मोजणी करा, परवानगी व्यतिरिक्त जास्त वाळू खोदली गेली असेल तर दोषींवर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या. आ. पवार यांच्यासोबत तहसीलदार सचिन खाडे, चकलांबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, राजेंद्र भंडारी, विठ्ठल मोटे यांच्यासह महसूल व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होेते.
आमदार साहेब, जीपीएस आणि आरटीओंच्या लाचखोरीकडे लक्ष द्या
गेवराई तालुक्यातील जेवढ्या प्रमाणात वाळू घाट देण्यात आले, त्या वाळु घाटांवरून वाळु उपसा करत वाहतूक करणार्‍या वाहनांना जीपीएस नव्हते. याची माहिती प्रशासनाला असताना याकडे दुर्लक्ष केले गेले. जीपीएस का नव्हते? हा प्रश्‍न उपस्थित करत आरटीओही या गाड्यांकडे दुर्लक्ष का करत होते? याकडेही लक्ष द्या.

Most Popular

error: Content is protected !!