Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमसराफा हत्या प्रकरणातील आरोपीच्या मामाची आत्महत्या

सराफा हत्या प्रकरणातील आरोपीच्या मामाची आत्महत्या


शिरूर पोलिसांच्या मारहाणीमुळेच घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप
शिरूर (रिपोर्टर):- येथील सराफा हत्या प्रकरणातील आरोपीच्या मामाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवत मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे आदिनाथ धोंडीराम गायके नावाच्या २५ वर्षीय तरुणाने पोलिसांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रात्री शिरूर येथे घडली. मयताच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या केवळ शिरूर पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचा आरोप केला. मात्र पोलिसांनी हे आरोप धुडकावून लावले. आज सकाळी आदिनाथ याच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या चार दिवसांपुर्वी शिरूर येथील सराफाची प्री प्लॅन हत्या करण्या तआली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी भैय्या गायकवाड हा फरार असून यातील अन्य दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. भैय्या गायकवाड याचा तपास करण्यासाठी पोलीस वेगवेगळे हतखंडे वापरत आहेत. त्याच्या शोधासाठी भैय्या याचा मामा आदिनाथ धोंडीराम गायके (वय २५) यास चौकशीसाठी बोलवून अपमानास्पद वागणूक देत त्याला मारहाणही केली गेली. यातून आदिनाथ गायके याने रात्री शिरूर येथील सलूनच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरचा प्रकार हा रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणात शिरूर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आज सकाळी मयत आदिनाथ याच्या बहिणीने शिरूर पोलिसात येऊन तुमच्या त्रासाला कंटाळूनच भावाने आत्महत्या केल्याची तक्रार केली. मात्र अशी तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर आदिनाथ गायके यास चौकशीसाठी बोलवले नसल्याचा दावाही शिरूर पोलिसांनी केला मात्र गायके यांच्या नातेवाईकांनी थेट शिरूर पोलिसांवर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

केवळ नातेवाईक आहे म्हणून संशय घेणं चुकीचं -धोंडे
आदिनाथ गायके या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर आज माजी आ. भीमराव धोंडे यांनी गायके कुटुंबियाची भेट घेतली. या वेळी माध्यमाशी बोलताना भीमराव धोंडे म्हणाले की, आदिनाथ गायके यांनी रात्री आत्महत्या केली. पोलिसांच्या चौकशीमध्ये मारहाण केल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा नातेवाईकांचा आरोप आहे. खरं पाहिलं तर आदिनाथ आणि त्या प्रकरणातील आरोपींचा काहीच संबंध नव्हता. केवळ नातेवाईक आहे म्हणून पोलिसांनी संशय घेऊन त्याला टॉर्चर करणं हे चुकीचं आहे. पोलिसांच्या या वागण्यामुळेच त्याने आत्महत्या केली आहे. आजही ग्रामीण भागामध्ये पोलिसांच्या दंडुकशाहीला लोक घाबरतात.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!