जिल्हा रुग्णालयाच्या दारात ठाण मांडून बसणार्‍या आंदोलनकर्त्यांना उठवले; जिल्हा शल्यचिकित्सकांनी कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्या

बीड (रिपोर्टर)ः जुन्या पेन्शन योजनेसाठी सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा सुध्दा समावेश आहे. कर्मचारी जिल्हा रुग्णालयाच्या दारातच ठाण मांडून बसले होते. यामुळे येणार्‍या जाणार्‍या रुग्णांना त्रास होत होता. जिल्हा शल्यचिकित्सकांनी सदरील आंदोलनकर्त्यांना त्याठिकाणाहून हटवले. त्याच बरोबर सर्व पेन्शनधारक कर्मचार्‍यांना आपण तात्काळ रुजू व्हावे म्हणून नोटीस बजावल्या आहेत. हजर न राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.
राज्यभरातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले. या संपात जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांचा सहभाग आहे. कर्मचारी रुग्णालयाच्या दारातच ठाण मांडून बसले होते. त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या रुग्णांना त्रास सहन करावा लागत असे. घोषणाबाजीमुळे अ‍ॅडमीट रूग्णांना त्रास होत असे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी सदरील आंदोलनकर्त्यांना त्याठिकाणहून उठवले.त्याच बरोबर कर्मचारी संपात सहभागी झाल्याने त्याचा परिणाम आरेाग्य सेवेवर झाला आहे. रुग्णांना उपचार मिळेना गेले.जिल्हा शल्यचिकित्सकांनी वरिष्ठांच्या आदेशानूसार संपात सहभागी असलेल्या पेन्शन धारक कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्या आहेत. दोन दिवसात कामावर रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे नोटीस मध्ये उल्लेख करण्यात आला आहे.