बीड, रिपोर्टर):- आईच्या उपचारासाठी 20 हजार रूपये उसणे दिलेले परत मागणार्याला लाथा-बुक्क्यांसह फायटरने मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना माजलगाव तालुक्यातील बाराभाई तांडा येथे घडली. याप्रकरणी काल माजलगाव ग्रामिण पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
सतिश रामराव राठोड रा. बाराभाई तांडा या शेतकर्याने संतोष गुलाब राठोड याला त्याच्या आईच्या उपचारासाठी 20 हजार रूपये ऊसने दिले होते. ते पैसे सतीश राठोडने परत मागितले असता संतोष गुलाब राठोड, विलास गुलाब राठोड, राम ज्ञानेश्वर जाधव, लहु शिवाजी जाधव, राजु शिवाजी राठोड, किशोर बबन जाधव, कैलास गुलाब जाधव सर्व रा. बाराभाई तांडा ता.माजलगाव यांनी संगनमत करून सतिश राठोड याला गंभीर मारहाण केली. फायटरने पोटात मारून मुक्का मार दिला व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद सतिश राठोडने माजलगाव ग्रामिण पोलीसात दिल्याने वरील लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.