अमृत महोत्सवासाठी काँग्रेस सरसावली, गौरव समिती गठीत अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नियुक्ती
बीड (रिपोर्टर) मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढ्याला 75 वर्षे पुर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्य सरकारने विविध कार्यक्रमांसंदर्भात आतापासूनच उपाययोजना आखायला हव्या होत्या. मात्र शासन याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने अमृत महोत्सव गौरव समिती गठीत केली असून सदरील समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहेत.
17 सप्टेंबर 2023 ला मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढ्याला पंच्याहत्तर वर्षे पुर्ण होत आहेत. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने विविध कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात आतापासूनच उपाययोजना करायला हव्या होत्या. राज्य सरकार याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत असल्याने काँग्रेस पक्षाने प्रांत अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतमहोत्सवी वर्ष गौरव समिती गठित करण्यात आली आहे. अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सहअध्यक्ष बसवराज पाटील, अमित देशमुख, सदस्य सुरेश वरपुडकर, कैलास गोरंटयाल, सुभाष धोटे, तुकाराम रेंगे पाटील, अमर जेजूरकर, राजेश राठोड, प्रज्ञा सातव, अनिल पटेल, रविंद्र दळवी, विलास औताडे, अशोक पाटील, भाऊराव बोरेगावकर, कल्याण काळे, श्रीशल्य उटगे, गोविंदराव नागेलीकर, नदीम इनामदार, राजाभाऊ देशमुख, धिरज कदम, राजेसाहेब देशमुख, किरण जाधव, शेख युसुफ, दिलीप देशमुख, प्रकाश देवतळे, संजय लाखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.