Friday, January 28, 2022
No menu items!
Homeराजकारणपवार घेणार अमित शाह यांची भेट

पवार घेणार अमित शाह यांची भेट


मुंबई (रिपोर्टर):- पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत ही भेट होत असून, या भेटीबद्दल आता तर्कवितर्क लावले जात आहेत. मोदी सरकारने मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महत्त्वाचा निर्णय घेत स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करण्याचा निर्णय घेतला. या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आलेली असून, सहकार खात्याशी संबंधित कामासंदर्भात पवार शाह यांना भेटणार असल्याचं वृत्त आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!