कृषी उत्पन्न बाजार समिती हमाल मतदार संघातून प्रचाराची सुरुवात
बीड (रिपोर्टर)- कृषी उत्पन्न बाजार समिती हमाल मतदार संघ हा सर्वात महत्त्वाचा असून हमाल बांधवांशिवाय या कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व आणि यंदाच्या निवडणुकीत हमाल नक्कीच धमाल करणारे असुन शेतकरी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी हमाल बांधवांच्या बैठकी दरम्यान केले.
बीड कृषी उत्पन्न बाजार समिती प्रस्थापितांना आसमान दाखवायचे असून या करिता महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी महाविकास आघाडी निवडणूक लढवीत असून प्रस्थापितांनी चाळीस वर्षे सत्तेचा उपयोग घेऊन बीड कृषी उत्पन्न बाजार समितीला दोनशे वर्ष मागे नेले असून शेतकर्याच्या पोराला सभापती करण्याचा निर्धार महाविकास आघाडीने घेतला असून आज हमाल व मापाडी (तोलारी) कामगारांची कॉर्नर बैठक याच अनुषंगाने होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे जडणघडणेमध्ये हमाल बांधवांचे खूप मोठे योगदान असून प्रस्थापितांची सत्ता उखळून लावण्यासाठी हमाल बांधव पेटून उठले आहेत. गेल्या चाळीस वर्षापासून हमाल बांधवांच्या मुख्य मागण्याला प्रस्थापितांनी तिलांजली दिली असून मार्केटयार्डमध्ये हमाल बांधवांसाठी नागरी सुविधा नाहीत. कार्यरत हमाल मापाडी काम करत असतांनाही बाजार समितीचे परवाने नाही. हमाल मापाडी यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही. हमाल मापाडी यांच्या आरोग्याला विमा योजना लागु करावी व आरोग्य विमा योजना कार्ड द्यावे. तुर,उडीद,सोयाबीन,बागवान साहेब संस्थेत खरेदी करून अद्याप हमाली तुलाई खरेदी हमालांना मिळाली नाही., पणन,कापूस खरेदीतील हमाली व तुलाई लेव्ही अद्याप मिळाली नाही., खासगी जिनिंग कापुस खरेदी तुलाई बाजार समिती व जिनिंग मालकांकडून मापाड्यांची तुलाई मिळाली नाही. याकरिताच शेतकरी महाविकास आघाडीने हमाल बांधवांसाठी मोठी योजना आखली असून हमाल बांधवांना मदत करणे हा या मागचा मोठा उद्देश आहे. सत्तेचे काही पण हो पण शेतकरी महाविकास आघाडी भविष्यामध्ये हमाला बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असे वक्तव्य आ.संदीप क्षीरसागर यांनी हमाल बांधवांच्या कॉर्नर बैठकीत केले. बीड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच परिवर्तन घडेल, आपले आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठशी असू द्या.