Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeक्राईममारहाण करणार्‍या विरोधात कठोर कारवाई करा, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे जखमींची निवेदन

मारहाण करणार्‍या विरोधात कठोर कारवाई करा, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे जखमींची निवेदन

cleardotcleardot

;जुन्या भांडणाच्या कारणावरून कुटुंबातील सदस्यांना केली मारहाण
बीड (रिपोर्टर):- जुन्या भांडणाची कुरापत काढत तिडके कुटुंबातील सदस्यांना बेदमपणे मारहाण केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी येथे घडली. याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जखमींनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शिवाजी दामोधर तिडके, दादासाहेब तिडके, रामप्रभु तिडके यांना महादेव तिडके, माणिक मुरकुटे, विनायक मुरकुटे, अशोक मुंडे, अशोक मुरकुटे यासह आदींनी घरात जावून मारहाण केली. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने वरबाडुन घेतले. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी संबंधिताकडून आपल्या जिविता धोका असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवाजी तिडकेंसह आदींनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे केली आहे

Most Popular

error: Content is protected !!