केज (रिपोर्टर) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये चांगलाच रंग भरत असून केज बाजार समिती निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होत आहे. आतापर्यंत बाजार समिती आडसकर यांच्या ताब्यात होती. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलाच जोर लावलाय. शिंदे गटाने निवडणुकीत पॅनल उभे केले आहे. सध्या प्रचाराचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे.
बाजार समिती निवडणुकीसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सध्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. केज कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या अनेक वर्षांपासून रमेश आडसकर यांच्या ताब्यात राहिली आहे. या निवडणुकीत तीन पॅनल पडले. एक पॅनल रमेश आडसकर यांचा, दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आला आहे. तिसरा पॅनल शिवसेनेचे सचिन मुळुक यांनी टाकला. मुळुक यांच्या सोबत पंजाब देशमुख, सय्यद नवाब, दादा ससाने इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. 15 जागेसाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. या तिन्हीपैकी कोणता पॅनल बाजी मारेल याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.