बीड (रिपोर्टर) वकिलास मारहाण केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी महादेव चव्हाण याचा जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्या. एस.टी. डोके यांनी फेटाळला.
बीड येथील वकील गणेश तावरे हे चुलत भावासोबत अम्ला वाहेगाव येथे 16 मे रोजी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मामाचा मुलगा उणवणे व गावातील रवी व्क्ते, बाळु देवडकर, महादेव चव्हाण यांच्यामध्ये भांडण चालु होते. त्यावेळी ड. तावरे यांनी समजावून सांगून हे भांडण मिटवले होते. परंतु, दुसर्या दिवशी, 17 मे रोजी अम्ला वाहेगाव येथील यात्रा संपल्यानंतर ड. तावरे व त्यांचा चुलत भाऊ बीडकडे येत असताना पाठीमागून चौघेजण मोटार सायकलवरुन आले. रवी वक्ते, महादेव चव्हाण, बाळू देवडकर, अविनाश वक्ते, सुनिल खराट, गोरक काळे व इतर दोन लोकांनी त्यांची गाडी आडवून दुचाकीची चावी काढून घेतली. रवी वक्ते व महादेव चव्हाण यांनी वकिलाच्या डोक्यात व अंगावर लोखंडी गजाने मारुन जखमी केले. डोक्यात मार लागल्याने ड. तावरे यांना 14 टाके पडले व हात फ्रॅक्चर झाला. या प्रकरणी ड. गणेश तावरे यांच्या फिर्यादीवरुन अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी महादेव चव्हाण याला पोलिसांनी अटक केले होते. आरोपी चव्हाण याने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनवणी होताना, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी साधी जखम असे प्रमाणपत्र दिले. तसेच या प्रकरणातील तपासात हाईगाई केली हा युक्तीवाद ग्राह्य धरत आरोपी महादेव चव्हाण याचा जामीन अर्ज न्या. एस.टी. डोके यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्यावतीने एन.डी. राख तर फिर्यादीच्यावतीने अॅड. अविनाश गंडले यांनी काम पाहिले. वकिल पत्रावर अॅड.प्रविण राख, अॅड. दत्ता डोईफोडे व इतर वकिलांच्या सह्या होत्या.