- आमदार सोळंकेंनी सोपवली युवकांच्या हाती कारखानदारी
- शेतक-यांना स्पर्धात्मक भावाची अपेक्षा
- सोळंके कारखान्याच्या अध्यक्षपदी विरेंद्र सोळंके तर उपाध्यक्षपदी जयसिंग सोळंके
माजलगाव (रिपोर्टर): लोकनेते सुंदरराव सोळंके साखर कारखान्याची मुहूर्तमेढ कै. सुंदरराव सोळंके यांनी उभारली होती. या साखर कारखानदारीत आता सोळंके कुटूंबीयांची तिसरी पिढी विरेंद्र सोळंके व जयसिंग सोळंके यांच्या माध्यमातुन आली असुन आमदार प्रकाश सोळंके यांनी सोळंके साखर कारखान्याची धुरा आता युवकांच्या हाती सोपवली असुन शेतक-यांना स्पर्धात्मक भावाची अपेक्षा आता आहे.
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याची उभारणी संस्थापक अध्यक्ष कै. सुंदरराव सोळंके यांनी केली होती. यानंतर या कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा आमदार प्रकाश सोळंके व त्यानंतर त्यांचे
बंधू धैर्यशिल सोळंके यांनी समर्थपणे सांभाळली आहे. सोळंके साखर कारखान्याने मागील 29 गाळप हंगाम यशस्वीरित्या पुर्ण केले असुन निर्मीतीपासुन एकही हंगाम बंद राहिलेला नाही. नुकतीच सोळंके साखर कारखान्याची पंचवार्षीक निवडणूक झाली असुन ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज ता. 23 शुक्रवारी कारखाना अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात पार पडला. यामध्ये कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी आमदार प्रकाश सोळंके यांचे पुत्र विरेंद्र सोळंके यांचा तर विद्यमान अध्यक्ष धैर्यशिल सोळंके यांचे पुत्र जयसिंग सोळंके यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जाधव यांनी कारखाना अध्यक्षपदी विरेंद्र सोळंके तर उपाध्यक्षपदी जयसिंग सोळंके यांच्या बिनविरोध निवडी झाल्याचे जाहिर केले. त्यामुळे कारखानदारी आता युवकांच्या हाती आली असुन शेतक-यांना स्पर्धात्मक भावाची अपेक्षा आहे. दरम्यान या निवडीतनंतर नुतर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मागील 30 वर्षांपासुन कै. सुंदरराव सोळंके यांनी सोळंके साखर कारखाना हा शेतक-यांच्या हिताचे धोरण राबविले असुन कारखान्याने शेतकरी हा केंद्रबिंदु मानुन काम केलेले आहे. शेतक-यांवर अन्याय होईल असे काम केले नाही. अल्प भुधारक शेतकरी देखिल समाधानी ठेवण्याचे काम केले आहे. हेच काम यापुढे आम्ही करणार असुन उस उत्पादक शेतक-यांचे हित जोपासले जाईल.
- विरेंद्र सोळंके,
नवनिर्वाचीत अध्यक्ष
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सुंदरराव सोळंके साहेबांनी कारखानदारीच्या माध्यमातुन शेतक-यांच्या जिवनामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचे काम यांनी केलेले असुन त्यांनी दिलेल्या संस्कारवरच वाटचाल करत विरेंद्र सोळंके व मी शेतकरी हिताचे धोरण राबविले जाईल.
- जयसिंग सोळंके,
नवनिर्वाचीत उपाध्यक्ष