Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबिंदुसरा पात्रात कचरा टाकणे थांबवा नसता पात्रात धरणे आंदोलन करणार

बिंदुसरा पात्रात कचरा टाकणे थांबवा नसता पात्रात धरणे आंदोलन करणार


बीड (रिपोर्टर)- बिंदुसरेच्या पात्रामध्ये नगरपालिका कचरा आणून टाकत असल्यामुळे पात्र दूषित होत आहे. नगरपालिकेने कचरा टाकण्यासाठी पर्याय शोधावा नसता पात्रामध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. मुख्याधिकार्‍यांनी या बाबतची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
बीड नगरपालिका शहरातील कचरा गोळा करून नगरपालिकेच्या पात्रात टाकत आहे. कचर्‍यामुळे नदीपात्र पूर्णत: दूषित झालं. परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. नगरपालिकेला अनेक वेळा या बाबत विनवणीही केली मात्र याची दखल नगरपालिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. इथून पुढे नगरपालिकेने कचरा टाकणे बंद केले नाही तर पात्रामध्येच धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सय्यद सादेक, रामभाऊ शेरकर, ज्ञानेश्‍वर राऊत सह आदींनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!