संशियत कागदपत्रे ताब्यात, वडवणी तालुक्यात खळबळ
वडवणी (रिपोर्टर):- पेशाने शिक्षक असणार्या खाजगी सावकराच्या घरी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वडवणी येथील एआर कार्यालयाच्या आधिकारी व पोलीसांनी छापा टाकत संशयत कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तर सदरील शिक्षकाला 30 जून पर्यत मत मांडण्याची मुदत दिली आहे.अशी माहिती सहायक निबंधक सहकार विभाग कार्यालयाचे प्रमुख शिवाजी नेहरकर यांनी दिली आहे.
याबाबत दिलेली माहिती अशी कि, वडवणी तालुक्यातील चिंचवण येथील रमेश अंबादास बडे यांनी एक महिन्यापुर्वी अवैद्य सावकरी बाबत शिक्षक असणारे शहादेव बळीराम मुंडे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. आज सकाळी एआर कार्यालयाचे आधिकारी व कर्मचारी सह पोलीसांनी शहादेव मुंडे यांच्या वडवणी येथील शिक्षक काँलनी येथील घरी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली असून तपासा अंती संशयत कागदपत्रे हाती लागली असून ती ताब्यात घेतली आहेत. तर याबाबत शहादेव मुंडे यांना 30 जून पर्यत मत मांडण्याची मुदत देण्यात आली आहे.यानंतर कारण काय हे स्पष्ट होणार आहे.तर यामध्ये शिक्षकाच्या घरी धाड पडल्याने वडवणी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये एआर कार्यालयाचे प्रमुख शिवाजी नेहरकर यांच्यासह आर.डी.शिंदे, निवांत सस्ते, पोलीस स्टेशनचे चव्हाण,जाधव व एलपीसी पवार आधिकारी आणि कर्मचार्यांनी धाड टाकली आहे.