Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईममहिलेला भुरळ घालून भामट्यांनी दागिने केले लंपास

महिलेला भुरळ घालून भामट्यांनी दागिने केले लंपास


बीड (रिपोर्टर)- आमच्या शेटला मुलगा झाला आहे, त्यामुळे ते गरीब लोकांना बुरखा आणि चप्पल वाटप करत आहेत, असे म्हणून एका महिलेचे दोन भामट्यांनी अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना परळी शहरात घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादी-वरून दोघा भामट्या-ंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील मलिकपुरा भागात राहणार्‍या आबेदा कासिम पठाण ही ५५ वर्षीय महिला उस्मानाबाद बँकेसमोर उभी असताना तेथे दोन अनोळखी व्यक्ती आले आणि त्या महिलेला म्हणाले की, आमच्या शेटला मुलगा झाला आहे त्यानिमित्त ते गरीब महिलांना बुरखा व चप्पल वाटप करत आहेत, असे म्हणत महिलेला भुरळ घालून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. या एक सोन्याचे पत्ता मणि (१५ ग्रॅम) व सोन्याची अंगठी असा एकूण ५३ हजार ७०० रुपयांचे सोने भामट्यांनी हातोहात लंपास केले. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात आबेदा पठाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हवालदार चट्टे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!