बीड (रिपोर्टर) केंद्र सरकार सुडबुद्धीने काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करत असल्याच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. हे आंदोलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
काँग्रेसचे खासदार तथा युवा नेते राहुल गांधी तथा पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षावर सुड उगवण्याचा प्रयत्न करतअसून ही केंद्र सरकारची हुकुमशाही आहे. या हुकुमशाहीच्या विरोधात आज बीड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी आदित्य पाटील, राहुल सोनवणे, रविंद्र दळवी, फरीद देशमुख, नवनाथ थोटे, अॅड. राहुल साळवे, रमेश सानप, गणेश बजगुडे, वचिष्ठ बडे, अॅड. गणेश करांडे, जयप्रकाश आघाव, संतोष निकाळजे, योगेश शिंदे, ईश्वर शिंदे, गणेश जवकर, विद्या गायकवाड, शामसुंदर जाधव, यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची या वेळी उपस्थिती होती.