बीड (रिपोर्टर) अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप तोडून घरातील लोखंडी पेटी उचलून नेऊन ते शेतात फोडली. त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्म असा १ लाख २० हजाराचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी तलवाडा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष ज्ञानोबा शिंदे हे शेतकरी भेंडटाकळी येथे राहतात. काल रात्री ते घरात झोपले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कडी कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी पेटी उचलून नेऊन ती त्यांच्या शेतात फोडली. त्यामधील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख ७५ हजार रुपये असा एकूण १ लाख २० हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. या प्रकरणी शिंदे यांनी तलवाडा पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नवगिरे हे करत आहेत.