सरपंच, उपसरपंचाचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
केज (रिपोर्टर): सोनीसांगवी येथील विजेचा डीपी खराब होऊ न पंधरा दिवस झाले. मागणी करूनही वीज वितरण कंपनी डीपी देत नसल्याने संतप्त सरपंच, उपसरपंचासह अन्य काही गावकर्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले.
केज तालुक्यामधील सोनीसांगवी येथे विजेचा ट्रान्सफार्मर पंधरा दिवसांपूर्वी खराब झाला. त्यामुळे आजपर्यंत गाव अंधारात आहे. ट्रान्सफार्मर तत्काळ बदलून द्यावा, अशी मागणी सरपंचाने वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी केली मात्र याची दखल घेतली जात नसल्याने सरपंच, उपसरपंच व इतर ग्रामस्तांनी पार्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाई आंदोलन केले. या वेळी सरपंच मुकुंद कणसे, राहुल डिकले, ज्योतीराम वाघमारे, सुरज गालफाडे, एजाज शेख यांचा या आंदोलनात सहभाग होता. दरम्णयान विजेअभावी नागरीकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या असून विज वितरण कंपनी विजेचे प्रश्न सोडवत नसल्याने गावकर्यांना हे पाऊल उचलावे लागले. या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाचे ली वेधून घेण्यात आले होते.