Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमक्राईम- डायरी- ‘तिसरी‘सोबत राहणार्‍या बापाने आवळला पोटच्या मुलाचा गळा

क्राईम- डायरी- ‘तिसरी‘सोबत राहणार्‍या बापाने आवळला पोटच्या मुलाचा गळा


बाबा म्हणजे परीक्षेत पास झाल्यावर पेढे आणणारे… बाहेरून येताना आवडीचा खाऊ घेऊन येणारे.. पोराच तोंडभरुन कौतुक करणारे… कुटुंबातल्या छोट्या-मोठ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे राहून कुटुंबातल्या सगळ्यांना आधार देणारे.. मुलांच्या जिवनात महत्त्वाचं स्थान असणारे… मुलांच्या प्रत्येक कामात त्यांना नेहमीच पाठिंबा देणारे.. मुलांना जे-जे हवय ते ते सगळं त्यांन देणारे… मुलांच्या सर्व इच्छा, हट्ट पूर्ण करणारे वगैरे वगैरे बाबा आपण नेहमीच पाहतो. मात्र काही मुलांच्या नशीबी असे आई-बाबा मिळत नाहीत. एकीकडे अलिशान गाड्या, बंगल्यात त्यांच्या आई-वडिलांसोबत राहणारे मुल तर दसरीकडे- आई-बाबांच्या भांडणामुळे एकटे पडलेले मुलं. त्यांचं भविष्य हे कठीण आणि आंधारमय असतं. बाबा हे प्रत्येकांसाठी आयडॉल असतीलच असे नाही. काहींच्या जिवार उठलेले बाबा पण या समाजामध्ये आहेत. मग ते अनैतिक संबधात अडथळा ठरतो म्हणून पोटच्या पोराची हत्या केल्याच्या घटना असो की अन्य. तर कोठे पैसे, जमिन यासाठी जन्मदात्याचा खून केला जातो. अशी एक धक्कादायक घटना समोर आली होती. बीड तालुक्यातील खडकी घाट येथील शेत वस्तीवर एका पत्र्याच्या शेडमध्ये १३ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलाचा गळा घोटणार्‍या नराधम बापास काही तासातच बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले होते. पहिल्या पत्नीच्या मुलाच्या नावे जमीन करावी लागेल म्हणून त्याने हे कृत्य केल्याची धक्कादाय बाब समोर आल्याने अनेकांची तळपायाचा आग मस्तकाला जात होती.

बीड तालुक्यातील नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकीघाट येथे उमेश मस्सा वाघमारे (वय ३३ वर्ष व्यवसाय शैती) हे आपले वडिल मस्सा आणि आई सोजरबाई, भाऊ परमेश्वर, भावजय, पुतण्या व मुलगा राकेश उर्फ जोत्या (वय १३ वर्षे) यांच्या सोबत राहत होता. उमेश याला दोन बायका होत्या. त्यापैकी पहिली बायको बोरखेड (ता. जि.बीड) येथील शाहू भोसले यांची मुलगी मायाबाई त्यांना एक मुलगा राकेश उर्फ जोत्या. मात्र उमेश त्याच्या पत्नीला सारखा त्रास देत असल्याने ती गेल्या दहा वर्षापासून बोरखेड येथे राहते. त्यानंतर उमेश याने घोडका राजुरी येथील रावसाहेब दादाराव खंडाळे याची मुलगी दुसरी पत्नी अर्चना केली. तिला तीन मुले झाली मात्र तीने काही दिवसापूर्वी आत्महत्या केली. तेव्हापासून तिचे तिनही मुले तीच्या आई वडीलांकडे राहतात ते त्यांचा सांभाळ करतात. उमेश त्यांच्याकडेही लक्ष देत नाही. मुलगा राकेश आणि उमेश हे दोघे बाप लेक राहत होते. उमेश हा उसतोडणीच्या कामासाठी बाहेरगावी गेल्यानंतर त्याचा मुलगा राकेश उर्फ जोत्या हा उमेशच्या आई वडीलांसोबत म्हणजे आजी-आजोबांसोबत राहत होता. तर या घटनेअगोदर दोन महिन्यापूर्वी उमेश हा बीडमध्ये एका महिलेशी लगट करुन तिच्यासोबत बीडमध्येच राहत होता. उमेशचा मुलगा राकेश आजी-आजोबांसाहेबत खडकीघाट येथील शेतवस्तीवर राहत होता.
जानेवारी २०२१ मध्ये वडील मस्सा यांना उमेशने जमिन त्याचा नावावर करा असा वडिलांकडे हट्ट धरला होता. मात्र उमेश हा बेवडा असून तो बाहेर वाईट मार्गावर गेल्याने तो जमिन विकून पैसे खर्च करील म्हणून उमेशच्या वडिलांनी जमिन पोराच्या नावे न करता नातवाच्या नावे करण्याचे ठरवले. त्यामुळे मस्सा यांनी उमेशला स्पष्ट सांगितले की मी तुझ्या नावावर जमीन करणार नाही. तुझ्या वाटयाची जमिन मी तुझा मुलगा राकेशच्या नावावर करणार आहे. त्यामुळे उमेशने वडीलाला चिडून डोक्यात दगड मारून जखमी केले होते. तेव्हापासून उमेशच्या मनात होते की, वडील जमिन त्याच्या नावावर न करता मुलगा राकेशच्या नावावर करणार आहेत. त्यामुळे आपण कसेही मुलालाच मारून टाकायाचे तेव्हाच जमिन आपल्या नावावर होईल. अन् त्याने राकेशच्या मर्डरचा प्लॉन रचला.
दि. १४ . सप्टेंबर २०२१ रोजी उमेश बीडवरुन सायंकाळी सात वाजता त्याच्या मुळ गावी शेतातील पत्र्याचे शेडकडे आला होता. तेव्हा त्याचा मुलगा राकेश हा आजोबांच्या घराकडून गावात जाताना दिसला. म्हणून उमेश याने त्याला हाक मारून बोलावून घेतले. तो त्याच्याकडे आल्यावर ते दोघे शेडमध्ये बोलत बसले. त्याला उमेशने ‘मी तुला पुण्याला घेवून जाणार आहे’ ‘आपण आत्ता इथेच झोपू व सकाळी उठून पुण्याला जावू‘ असे म्हणाल्याने तो व उमेश तेथेच पत्र्याच्या शेडमध्ये झोपले. आपला बाप आपल्याल्या मोठ्या शहरात घेवून जाणार आहे. हे स्वप्न पाहून राकेश निवांत झोपी गेला. मात्र उमेशच्या मनात भलतच होत. आपण मुलाचा खून करायचा असा प्लॉन त्याने मनोमन केला होता. मात्र याची जराशीही कल्पना राकेशला नव्हती. तो आपल्या बापाच्या कुशीत निवांत झोपला होता. खून कसा करायचा याच्या विचारात उमेशला झोप लागली. अन् तो मध्येरात्री तीन वाजता पुन्हा उठला. मुलगा राकेश हा झोपलेला होता. त्याला उमेशने उठविण्याचा प्रयत्न केला मात्र तो निवांत तोपला होता. आपला बाप आपल्या सोबत असेल तर आपल्याला कोणाची काय भिती म्हणून राकेशही निवांत झोपला असेल. त्याला काय माहिती आपला बापच आपला घात करणार आहे. उमेशने शेडच्या बाहेर येवून तंबाखू खाल्ली व शेडमध्ये जावून दाराच्या जवळ असलेली दोरी हातामध्ये घेवून दोरीने मुलगा राकेश उर्फ जोत्याचा गळा आवळला. त्यावेळी त्याने त्याचे हात पाय खोडले. मात्र उमेशने त्यास दाबून धरले. त्यामुळे त्याने हालचाल केली नाही. दोन मिनिटात त्याची हालचाल बंद झाली. तेव्हा उमेशने त्याचा आवळलेला गळा सोडून दिला. त्यानंतर तो मेला असल्याची खात्री करून त्याच्या अंगावर रघ टाकून शेडचे दार लावून उमेश तेथून गावाच्या दिशेने निघून गेलो. गावाच्या बाहेरून तो रौळसगाव फाट्यावर आला अन् तेथून एका ट्रकला हात करत बीडला गेला.
दि. सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मस्सा यांचा दुसरा मुलगा परमेश्वर त्याचे आईस म्हणाला राकेश उर्फ ज्योत्या रात्री घरी आला नाही. तो कोठे झोपला आहे. मी त्यास पाहुन येतो. असे म्हणून तो उमेशच्या घराकडे गेला. त्यावेळी राकेश उर्फ ज्योत्या हा घरामध्ये झोपल्यासारखा दिसला म्हणून त्याने त्यास आवाज़ दिला. व हाताने हालून पाहिले असता तो उठला नाही. त्यावेळी त्यांने त्याची पत्नी वनिता हिस आवाज देवून सांगितले की, राकेश उर्फ ज्योत्या हातपाय हालत नाही, उठत नाही, गार पडला आहे. तु भाऊ व आक्काला (आई-वडील) यांना बोलावून आण त्यावरून वनिता विहरीकडून घराजवळ आली व मस्सा यांना राकेश उर्फ जोत्या उठत नाही, हात पाय हालवत नाही, तो गार पडला आहे. तुम्हास मालकाने उमेशच्या घराकडे बोलाविल आहे. असे सांगितले. त्यावरून मस्सा यांची पत्नी उमेशच्या घराकडे गेली व मोठमोठ्याने ओरडू लागली. म्हणून मस्सा हे लगेच तिच्या पाठोपाठ उमेशच्या घराकडे गेले. घरात जावून पाहिले असता राकेश उर्फ ज्योत्या घरात झोपलेल्या अवस्थेत दिसला. मस्सा यांनी जोत्या उठ असे म्हणून आवाज दिला. परंतु तो उठला नाही. त्यास त्यांनी हाताने हालून पाहिले परंतु त्याची काही हालचाल होत नव्हती. तो गपचूप पडलेला होता. त्यावेळी मस्सा यांनी बारकाईने पाहिले असता त्याच्या गळ्याला काचलेले व काळे निळे झालेले वन दिसले. त्यावरून त्याच्या लक्ष आले की, मुलगा उमेशच्या नावावर जमिन केली नाही. काही जमिन राकेशच्या नावावर करणार असल्याचा राग मनात धरुन मुलगा उमेश वाघमारे याने नातु राकेशचा दोरीने गळा आवळून खून करून तो तेथून निघून गेला आहे. अशी तक्रार मस्सा भिाम वाघमारे यांनी नेकनुर पोलिसांना दिली. त्यावरुन नेकनुर पोलिस ठाण्यात आरोपी उमेश विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेकनुर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात खून करुन फरार होण्याच्या तयारीत असलेल्या उमेशच्या पाटोदा येथून मुसक्या बांधत त्याला न्यालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तिन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्या दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता त्याने राकेश उमेश वाघमारे याच्या नावावर वडील मस्सा हे जमीन करतील म्हणून त्यालाच मारल्यावर ती जमीन माझ्याच नावावर होईल या हेतूून त्याने राकेशचा खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली.
पहिल्या पत्नीचा मुलगा राकेश हा आज्जी-आजोबांसोबत खडकी घाट येथे राहत होता. राकेश हा पहिल्या पत्नीचा मुलगा असल्याने वडिलोपार्जित सहा एकर जमीनपैकी काही जमीन राकेशच्या नावावर ती करावी लागेल म्हणून वाद सुरु होता. या वादातून रात्री राकेशला वस्तीवरील शेडमध्ये नेऊन त्याचा खून करून नराधम उमेश पहाटेस गाव सोडून निघून गेला होता. उमेश हा घटनेच्या दोन महिन्यापूर्वी बीडमध्ये एका महिलेसोबत राहत हेाता. जनिमिच्या हव्यासापोटी पोटच्या पोराचा गळा घोटून खून केलेला उमेश आता जेलची हवा खात आहे. आपण आपल्या पोटच्या मुलाचा खून केला याचा त्याला थोडासाही पश्‍चाताप होत नाही. ‘माझा मुलगा आहे. मी मारला’ कोणाचं काय गेल’ असा आरोपी त्याच्या बापला अन् पोलिसांन म्हणत आहे. या घटनेचा संपूर्ण तपास ठाणे प्रमुख सपोनि मुस्तफा शेख, यांनी केला. त्यांना पोलिस कर्मचारी महाविर चव्हाण, बाळकृष्ण जायभाय, गणेश घोलप, अमोल नवले, दिपक खांडेकर, भारत माने, गाळकृष्ण नागरगोजे यांच्यासह आदींचे सहकार्य मिळाले.

Most Popular

error: Content is protected !!