बीड (रिपोर्टर): जिल्हा प्रशासनाने जे की सेतु चालक काम करत नाहीत अशा सेतु चालकांचा आयडी कोड बंद करून ते सेतु केंद्र बंद केले आहेत. त्यानंतर महसूल मंडळाचा विचार करता बीड जिल्ह्यात नवीन 276 सेतु केंद्र चालकांना जिल्हा प्रशासनाकडून लवकरच मुलाखती घेऊन मंजूर करण्यात येणार आहेत.
सर्व प्रकारचे पीक विमा, सर्व प्रकारचे प्रमाणपत्र व ग्रामीण भागातील सर्वच कामे आता ऑनलाईन झाले आहेत. जिल्ह्यात महाऑनलाईन सेतु केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे हे सर्व्हर नेहमीच डाऊन होत होते तर शेतकरी आणि विद्यार्थ्यांना आपला काम दंदा बुडवून ऑनलाईन कामासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागत असे. त्यासोबतच ग्रामीण भागात एक तर तालुक्याच्या ठिकाणी हे सेतु केंद्र असल्यामुळे जावे लागत असे. या सर्व बाबी लक्षात घेता ज्यांना महाऑनलाईन सेतु केंद्राचा कोड दिला आहे त्यांचे वर्ष दोन वर्षातील कामाचे ट्रँझेक्शन बघून ज्यांचे ट्रांझेक्शन कमी आहे किवा ज्यांचे काहीच ट्रँझेक्शन नाही अशा जिल्ह्यातील 108 सेतु केंद्र जिल्हा परिषद प्रशासनाने बंद केले असून नव्याने 276 सेतु केंद्रांना महिनाभरात परवानगी देण्यात येणार आहे.