बीड/मुंबई (रिपोर्टर) शिवसेनेच्या काफिल्यातून बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या काफिल्यात आमदारांची बहुगर्दी होत असल्याने आणि शिंदे आपण शिवसेना सोडणार नाही, असे सातत्याने म्हणत असल्याने आता थेट ‘शिंदेशाही’ शिवसेना पक्षावर दावा करू पहात असून शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्य मिळवण्यासाठी शिंदेशाही प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे. चिन्ह मिळवण्याच्या प्रक्रियेसाठी शिंदे गटाकडून हालचाली केल्या जात असल्याचेही वृत्त येत आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राला उद्देशून सोशल मिडियातून आपली भूमिका मांडत पुन्हा परत येण्याचे आवाहन बंडखोर आमदारांना केले. मात्र या आवाहनाला शिंदेशाहीकडून प्रतिसाद मिळाला नाही उलट मातोश्रीवर भेट होत नसल्याचे अनेक आमदारांनी आपल्या तक्रारस्वरातून म्हटले. दुसरीकडे आता राज्यातले महाविकास आघाडी सरकार खाली खेचण्याचा इरादा तर अंतिम टप्प्यात आला आहे, आता थेट शिंदे गटाकडून शिवसेनेला आव्हान दिलं जात असून पक्षच बळकावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यावर शिंदे गटाची नजर आहे. धनुष्यबाण आपल्याला मिळावं यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया कशी करायची? काय करायचे? याचे मार्गदर्शन लागलीच मागवण्यात येत आहे.
बंडखोर आमदाराचं खुलं पत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली भूमिका मांडल्यानंतर बंडखोर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पत्राच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरला हे पत्र शेअर केलं आहे. यामध्ये संजय शिरसाट यांनी आमदारांच्या भावना व्यक्त केल्या असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते भावनिक होतं. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठे मिळालीच नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे पत्र लिहिलं असल्याचं आमदारांनी सांगितलं आहे. पत्रात शिरसाठ म्हणाले, काल वर्षा बंगल्याची दारं खर्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती, अशी नाराजी संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे आमदार फुटू शकतात ही अपेक्षा नव्हती; पण आम्ही ठाकरेंच्रा पाठीशी, जरंत पाटील रांचा निर्धार
शिवसेनेचे आमदार फुटू शकतात ही अपेक्षा नव्हती. त्रातही मुंबईतील आमदार फुटले राचे आश्चर्र वाटते. मात्र, आम्ही उद्धव ठाकरेंच्रा पाठिशी आहोत, अशी प्रतिक्रिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जरंत पाटील रांनी व्रक्त केले. ते मुंबईत बोलत होते. जरंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्रा बाहेर गेलेल शिवसैनिक हे परत रेतील. ते पुन्हा आपल्रा स्वत:च्रा पक्षात कार्ररत राहतील, असा आमचा विश्वास आहे. रा महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्राने आमचा त्रांना रापूर्वीही पाठिंबा होता आणि पुढेही राहणार असल्राचे स्पष्ट केले.
अजून मुख्रमंत्रिपद सोडलं नाही
जरंत पाटील म्हणाले की, शिवसेनेच्रा अंतर्गत कार चाललंर हे आम्हाला माहिती नाही. पण काल मी, शरद पवार, सुप्रिरा ताई रांनी उद्धव ठाकरे रांची भेट घेतली. त्रांना सर्व ती शक्र मदत करण्राची तरारी दर्शवली. हे सरकार शेवटपर्रंत टिकण्रास आम्ही तरार आहोत. वर्षा बंगल्रावर ते आधीही राहण्रास तरार नव्हते. ते फक्त प्रशासकीर सोरीसाठी ते तेथे राहत होते. वर्षा बंगला सोडला म्हणजे त्रांनी मुख्रमंत्रिपद सोडलं नाही, ते आजही मुख्रमंत्री आहेत.
संजर राऊतांचा मोठा दावा: 20 आमदार आमच्रा संपर्कात
ईडीच्रा धाकाने किंवा अन्र काही आमिषाला बळी पडून काही आमदार पळाले असतील, विशेषत: जे स्वत:ला बछडे वाघ म्हणवून घ्रारचे तर ते म्हणजे पक्ष नाही, अशी प्रतिक्रिरा शिवसेना खासदार संजर राऊत रांनी दिली. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, आपण जो काल रस्त्रावर पाहिला तो पक्ष आहे. आणि हा पक्ष उद्धव ठाकरे रांच्रा नेतृत्वाखाली मजबूत आहे. चार आमदार आणि कुणी दोन खासदार किंवा दोन नगरसेवक गेला म्हणजे पक्ष गेला असे नाही होत. आणि हे का गेले सोडून राची कारणे लवकरच समोर रेतील. तरीही त्रांच्राशी चर्चा सुरू आहे.