बीड (रिपोर्टर)- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी ठिकठिकाणी साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खापर पांगरी येथील गावकर्यांनी आंदोलन केले. या वेळी अनेक तरुणांचा सहभाग होता.
मराठा समाजाला तात्काळ आरक्षणाची घोषणा करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज खापर पांगरीच्या गावकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी उपसरपंच संदीप चव्हाण, निखिल चव्हाण, माजी सरपंच विक्रम शेंडगे, संपत शिंदे, अमोल चव्हाण, दत्ता शेंडगे, रेवणनाथ काटकर, भगवान शेंडगे, शहादेव थोरात, शेंडगे अविनाश, शेंडगे बिभिशन, दत्ता खामकर, शुभम मिसाळ, वसंत शिंदे, नारायण शिंदे, संजय शिंदे, अशोक मिसाळ, काटकर, कदम, शेख रफीक, सुपेकर, बाबु भोसले, गहिनीनाथ शिंदे, बाळु मिसाळ, शिवा आजबे, लहू वटारे, अशोक ढोले, शेंडगे, गणेश काटकर यांच्यासह आदी तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.