बीड (रिपोर्टर) गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाल्यावरून त्यांनी साळेगाव – केज मार्गावर सापळा लावला असता त्यांना एक इसम गुटख्याचे पोते घेऊन जात असल्याचे आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुटख्यासह दुचाकी असा एकूण 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
केजचे सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना गुप्त माहिती मिळाली की, साळेगावकडून केजकडे एक इसम अवैध गुटखा घेऊन जात आहे. त्यावरून केज येथे बालाजी दराडे, टुले यांनी सापळा रचून दुचाकी (क्र. एम.एच. 23 यू. 5005) ही दुचाकी अडवून दुचाकी चालक शेख सादेक शेख समद (वय 32, रा. टेलर गल्ली, मंगळवार पेठ केज) याला त्याच्याकडील मालाबद्दल विचारपूस केली असता त्याच्या जवळ 9 हजार 600 रुपयांचा प्रिमियम राजनिवास गुटखा, 2 हजार 400 रुपयांचा जाफरानी गुटखा मिळून आला. पोलिसांनी गुटख्यासह त्याची दुचाकी जप्त करून पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या स्वाधीन केली.