
श्रीक्षेत्र चाकरवाडीत मिनी कुंभमेळा प्रचंड गर्दी
बीड (रिपोर्टर): विसाव्या शतकातील महान संत विभुती ज्ञानेश्वर दादा माऊली यांनी लोकोद्धाराचे काम केले. त्यामुळे आज श्रीक्षेत्र चाकरवाडीत मिनी कुंभ मेळा भरला आहे. संतांच्या आशीर्वादांची शिदोरी आयुष्यभर सरत नाही असे प्रतिपादन प्रकाश महाराज बोधले यांनी केले. दुसर्या दिवसाचे कीर्तन पुष्पगुंपताना ते बोलत होते.. यावेळी प्रमुख उपस्थिती महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत महादेव महाराज चाकरवाडीकर श्री ह.भ. प. नारायण भाऊ उत्तरेश्वर पिंपरीकर, ह.भ. प. रामकृष्ण रंधवे बापू, श्री ह भ प नाना महाराज कदम, श्री ह.भ. प. सुरेश महाराज जाधव, श्री ह.भ. प. गणेश महाराज जोगदंड श्री ह.भ. प.हरिदास भाऊ जोगदंड, शिवानंद महाराज गिरी यांच्यासह हजारो भावी फक्त उपस्थित होते.
बीडच्या श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे विसाव्या शतकातील महान संत विभूती ज्ञानेश्वर दादा माऊली यांच्या रोप्य महोत्सवी पुण्यतिथी उत्सवात दुसर्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प प्रकाश महाराज बोधले यांनी वाहिले..
यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥1॥
नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥2॥
तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥3॥
या अभंगावर चिंतन मांडले यावेळी पुढे बोलताना महाराज म्हणाले की मराठवाड्यामध्ये वारकरी संप्रदाय प्रचार प्रसाराचे काम दादा माऊलींनी मोठ्या प्रमाणात केली त्यांनी संपूर्ण आयुष्य जनसामान्यांच्या उद्धारासाठी खर्च केले. त्यामुळेच आज हा वैभवशाली सोहळा होत आहे..
पुढे बोलताना महाराज म्हणाले की जगातील प्रत्येक माणूस स्वार्थी त्यागी माणूस आजपर्यंत जन्माला आलेला नाही. संतही मागतात देवही मागतो आणि जीवही मागतो.. प्रत्येकाची मागणी वेगवेगळ्या असते..नको ब्रम्ह ज्ञान आत्मस्थिती भाव… साधू भक्ती प्रेम मागतात. परमार्थ चांगला सुरू असेल तर देव संसारातील काही तरी गोष्ट अनुकूल करतो जीव त्यात अडकतो
या अभंगात संताकडे आशीर्वाद मागतात. राजाकडे वैभव मागावे. संताकडे आशीर्वाद मागावा. आशीर्वादामध्ये खूप मोठी ताकद असते..प्रतिज्ञा ही शक्ती ने केली जाते… आशीर्वाद हा देणार्यांच्या अंतकरणाच्या समाधानाचा भाव असतो.. या अभंगांमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या दाशीचा तास करण्याची मागणी करतात. भक्ती काय आहे ही संतांनीच सांगितली पाहिजे.. कारण संत अनुभवाला आणून देतात.आपल्याला भक्ती कशी करवी हे माऊलींच्या पुण्यतिथी उत्सवात कळते. संतांच्या पायाच्या आधारानेच भव नदी तरुण जाता येते असे महाराज म्हणाले.
कीर्तनात साथ संगत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग वादक राम महाराज काजळे, गायनाचार्य बिबीशन महाराज कोकाटे ओंकार महाराज जगताप ,अभिमान महाराज ढाकणे, विष्णु महाराज, संजय महाराज देवकर, माऊली महाराज आवटे यांच्यासह शेकडो टाळकरी मंडळी उपस्थित होते.








