बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. तालुक्णयातील उमरद जहागीर येथील एका तरुण शेतकर्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील हा प्रकार आज सकघाळी उघडकीस आला. त्याने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही.
विलास शिवनाथ कांळे (रा. उमरद जहागीर, वय 32) या तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. सदरील शेतकर्याने कुठल्या कारणावरून आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत आहेत.
विहिरीत पडून 20 वर्षीय महिलेचा मृत्यू
एक वर्षापूर्वीच झाले होते लग्न
पाणी काढत असताना 20 वर्षीय महिलेचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल परभणी तांडा येथे घडली. आज सकाळी जिल्हा रुग्णालय येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
वर्षा संजय पवार (वय 20 वर्षे) रा. परभणी तांडा) ही महिला काल आपल्या शेतामध्ये शेळ्या सांभाळण्यासाठी गेली होती. आपल्या विहिरीतून पाणी काढत असताना तिचा तोल गेला व ती पाण्यात बुडून मरण पावली. घटनेची माहिती नागरीकांना झाल्यानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज सकाळी जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.