कार्यालय बांधल्यापासून स्वच्छता केली नाही का? अनेक ठिकाणी गळकी लागली
बीड (रिपोर्टर) नगर रोडवर तहसिल कार्यालयाची भव्यदिव्य इमारत आहे. मात्र ही इमारत घाणीच्या विळख्यात सापडली. खालच्या मजल्यापासून ते थेट वरच्या मजल्यापर्यंत उकिरड्यावर कमी पण कार्यालयात जास्त घाण दिसून येत असल्याने कर्मचारी अशा घाणीमध्ये कसे काम करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे जिथे तिथे घाण आहे. तर दुसरीकडे अनेकठिकाणी इमारतीला गळकी लागली आहे. याकडे तहसिल प्रशासन का दुर्लक्ष करत आहे?
बीडच्या तहसिल कार्यालयामध्ये अनेक कार्यालये आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी तहसिलची भव्यदिव्य इमारत बांधण्यात आली. इमारतीमध्ये योग्य ते स्वच्छता दिसून येत नाही. खालच्या मजल्यापासून ते वरच्या मजल्यापर्यंत उकिरड्यावर कमी पण कार्यालयाच्या दारात जास्त घाण दिसून येत आहे. कागदासह थुंकलेल्या गुट्खाच्या पिचकार्या जिथे तिथे पहावयास मिळत आहे. तहसिल कार्यालयाला निदान शिपाई तरी असेल जेणेकरून रोज झाडझुड करत असेल. एकीकडे तहसिल कार्यालयात घाणीचे साम्राज्य तर दुसरीकडे अनेकठिकाणी इमारतीला गळकी लागलेली आहे. पावसाळ्यात इमारत गळत आहे. इमारत अगदी स्वच्छ असावी असे तहसिल प्रशासनाला वाटत नाही का? तहसिलदार यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघून इतर सर्व कार्यालयाची पाहणी करण्याचे थोडे कष्ट सहन करावे म्हणजे त्यांना आपल्याच कार्यालयात किती प्रमाणात घाण साचलेली आहे. हे दिसून येईल. इमारत बांधण्यापासून वरच्या मजल्याचा परिसर स्वच्छ केला नाही का? असाही सवाल उपस्थित होत आहे. कार्यालयात येणारे जाणारे काही हौशे नौशे उकिरड्यात थुंकल्याप्रमाणे कार्यालयाच्या कोपर्यात कोठेही पिचकार्या मारून घाण करत आहे. अशा पिचकार्या मारणार्यांना दंडात्मम कारवाई करण्याचे काम तहसिल प्रशासनाने करायला हवे.