बीड (रिपोर्टर): महसूल कर्मचार्यांच्या मागण्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने 10 तारखेपासून महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज सर्व महसूल कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने केली. तालुका पातळीवरही आंदोलन झाले.
महसूल कर्मचारी संघटनेने अनेकवेळा आपल्या मागण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. शासनाने मात्र कर्मचार्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले. शासन आपल्या मागण्या मान्य करत नसल्याचे पाहून कर्मचारी संघटनेच्या वतीने 10 तारखेपासून वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येत आहे. आज बेमुदत काम बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात सर्व कर्मचार्यांचा सहभाग होता.
नगर पंचायतसाठी नेकनूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
नेकनूर (रिपोर्टर): नेकनूर ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा मिळावा अशी मागणी सातत्याने होत आहे. राज्य सरकारने याबाबत अंमलबजावणी करावी यासाठी आज काही नागरीक ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत.
बीड तालुक्यातील सर्वात मोठी नेकनूरची ग्रामपंचायत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार नेकनूर ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. राज्य सरकारने ग्रामपंचायतला नगर पंचायत करावे यासाठी आजपासून सय्यद शोएब, मतीन खतीब, अमेर जहागिरदार, त्रिंबक काळे यांच्यासह आदी नागरीक नगर पंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत.