जलजीवनच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी 1 मे ला गावकर्यांचे बेमुदत धरणे आंदोलन.
टाकरवण, (रिपोर्टर)ः- जलजीवन मिशन योजनेतून टाकरवण येथे पावणे पाच कोटी रुपये खर्चुन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. अपूर्ण कामामुळे नळाला पाणी येत नसल्याने भर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून गावकर्यांना विकतच्या पाण्यावर तहान भागवी लागते. बोगस कामाच्या चौकशीसाठी एक मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय टाकरवण येथे गावकर्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंबंधीत जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी गुत्तेदार व आमदार विजयसिंह पंडित यांना निवेदन दिले आहे. माजलगाव तालुक्यातील टाकरवण हे अंदाजे 15 हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी व पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पावने कोटी रुपये मंजूर केले. मात्र संबंधित गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे तिन वर्षानंतर ही काम अपुरेच राहिले असून. टाकरवन करांना भर उन्हाळ्यात पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. परिणामी विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे. जल जीवन मिशन
जिल्हाधिकार्याकडे तक्रार करून ही कारवाई नाही.

टाकरवन येथे राबवलेली पाणीपुरवठा योजना बोगस भ्रष्ट असून पावणे पाच कोटी खर्चुन ही गावकर्यांना पाणी भेटत नाही. इस्टिमेट नुसार काम न झाल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय बीड पाणीपुरवठा विभाग यांना निवेदनातुन तक्रार केली होती मात्र अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याने. व पाणी प्रश्न गंभीर बनत चालल्याने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कपील आडागळे, मानवी हक्क अभियान तालुका सचिव माजलगाव जलजीवन मिशन योजनेतून उभारलेली पाण्याची टाकी पाणी शुद्धीकरनासाठी ऊभारलेले फिल्टर खोदलेली विहीर शोभेची वस्तू बनली आहेत. अनेक घरापर्यंत नळ कनेक्शन पोहचले नाहीत अनेकांच्या घरी कनेक्शन पोहोचले असले तरीही अद्याप त्याला पाणी येत नसल्याने कोठ्यावधीची योजना फोल ठरली आहे. संबंधित गुत्तेदाराने योजनेचे काम बोगस केले आहे व शासनाने दिलेल्या कालावधीत हे पूर्ण झाले नाही त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणी प्रश्न गंभीर होत चालला असून या बोगस कामाच्या चौकशीसाठी मानवी हक्क अभियान संघटना व सर्व ग्रामपंचायत सदस्य मा. उपसरपंच .गोबरे दयानंद शिवाजी,सर्व ग्रामस्थ 1 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय टाकरवण समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे जिल्हाअधीकारी ग्रामिण पाणीपुरवठा विभाग अमदार विजयसिंह पंडित सबंधीत गुत्तेदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
18 महिन्याचा कालावधी. माञ तिन वर्ष होऊनही काम पूर्ण नाही
दि. 28 मार्च 2022 रोजी मा. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद बीड, ने कार्यारंभ आदेश दिला. दिलेला आदेश जल जीवन मिशन कार्यक्रम तिर्गत टाकरवण तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत होता. या कार्यारंभ आदेश मध्ये नळ पाणी पुरवठा योजना ही 18 महिन्यांच्या कालावधीत करण्याचे आदेश दिलेले होते. परंतु आज रोजी तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत तरीही नळ पाणीपुरवठा योजना अपुरीच आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
उच्चस्तरीय समिती गठीत होऊन चौकशी करण्यात यावी.
टाकरवण गावांतर्गत कोणत्याच सार्वजनिक ठिकाणी नळाचे कनेक्शन दिलेले नाही. तरी टाकरवण अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी नळ कनेक्शन देण्यात यावे.
तातडीची पाणी पुरवठा म्हणून टाकरवण गावांतर्गत टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. पाईपलाईन करताना गावातील सिमेंट रस्त्याचे नुकसान झाले होते ते पूर्ण सिमेंट रस्ते तयार करून देण्यात यावेत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत टाकरवन येथील नळ पाणीपुरवठा योजनेची उच्चस्तरीय समिती गठीत करुन चौकशी करण्यात यावी.अशी मागणी
मा. उपसरपंच गोबरे दयानंद शिवाजी,ग्रामपंचायत सदस्य डॉ. गायकवाड अंगद बाबुराव, अशोक भगवान खुळे,भुंबे पंढरीनाथ शेषेराव,इनामदार परवीनबी रजाक,सातपुते स्वाती गणेश,काजळे शोभा सुभाष,पटेकर दादासाहेब मुंजाबा,आडागळे जनार्धन मारुती,आडागळे विद्या कपिल.








