केज , (रिपोर्टर)-रात्रीच्रा वेळी घरासमोर दुचाकी लावत असलेल्रा तरुणाच्रा खिशातील 5 हजार रुपरे बळजबरीने काढून घेत हँडललॉक तोडून दुचाकी घेऊन निघालेल्रा तिघांना लोकांनी पाठलाग करीत पकडून पोलिसांच्रा स्वाधीन केले. ही घटना केज तालुक्रातील सारणी (सां.) रेथे घडली असून राप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज – मांजरसुंबा रस्त्रावरील सारणी (सां.) रेथील पंढरी त्रिंबक घोळवे हा तरुण 13 जुलै रोजी रात्री 10 वाजता त्राची दुचाकी (एम. एच. 44 जे. 9383) घरासमोर लावीत असताना मांजरसुंब्राकडून दुचाकीवर आलेल्रा अनोळखी तिघांनी जीवे मारण्राची धमकी देत त्रांच्रा पँटच्रा खिशातील 5 हजार रुपरे बळजबरीने हिसकावून घेतले. त्रानंतर एकाने त्रांच्रा दुचाकीचे हँडललॉक तोडून दुचाकी घेऊन जाण्राचा प्ररत्न करीत असताना पंढरी घोळवे रांनी आरडाओरड केला. राचवेळी त्रांचे शेजारी दत्तात्रर अशोक घोळवे, चंद्रकांत अशोक घोळवे, प्रदीप शिवाजी घोळवे व इतर लोकांनी त्रांचा पाठलाग करीत तिघांना पकडले. पकडलेल्रा तिघांकडे नाव व गावाची विचारणा केली असता त्रांनी आवेज उर्फ खाजा शेख (रा. केज), अनिकेत भारत जाधव (रा. बोबडेवाडी), जुबेर मुस्ताक फारुकी (रा. रोजा मोहल्ला, केज) अशी सांगितली. त्रानंतर त्रांनी पोलिसांशी संपर्क साधून त्रा तिघांना पोलिसांच्रा स्वाधीन केले. पंढरी घोळवे रांच्रा तक्रारीवरून आवेज उर्फ खाजा शेख, अनिकेत जाधव, जुबेर फारुकी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करीत आहेत.