धारूर (रिपोर्टर) गेल्या आठ दिवसांपुर्वी तरुण मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मुलाच्या विरहातून पित्यानेही आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारूर तालुक्यातील आसोला येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवार दि. 8 जुलै रोजी श्रीकृष्ण मोहन चोले (वय 27) याने धारूर बसस्थानक परिसरात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. श्रीकृष्णचे वडिल मोहन चोले हे पंढरीच्या वारीला गेले होते. आपल्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना त्यांना समजताच ते वारीतून परत आले. गेल्या आठ दिवसांपासून आपल्या मुलाच्या विरहात ते होते. आज सकाळी कोळपिंप्री शिवारातील बाभळीच्या झाडाला मोहन चोले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.