बाल बालकल्याण विभागात खळबळ
आष्टी (रिपोर्टर): अंगणवाडी सेविकेचे वेतन वाढले, वाढलेले वेतन पाहून अंगणवाडीच्या सुपरवायझरने संबंधित अंगणवाडी ताईस ‘तुझ्या अंगणवाडीचा दर्जा वाढला आहे, तुझे वेतन वाढले आहे, त्यामुळे तू आम्हाला पैसे दे, नसता तुझे वेतन आम्ही रोखून धरू,’ असं म्हटल्यानंतर संबंधित अंगणवाडी ताईने आपल्या लाचखोर सुपरवायझर विरोधात लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. ओळख परेड झाल्यानंतर आज लाचलूचपत खात्याच्या पथकाने आष्टीच्या एकात्मिक बालविकास सेवा कार्यालयातच सापळा रचला अणि त्याठिकाणी तेथील एकात्मिक बालविकास सुपरवायझर अमृता श्रीकांत आष्टे व कनिष्ठ सहाय्यक निता रामदास मलदोडे या दोन लाचखोर महिलांना लाच घेताना रंगेहात पकडले. या घटनेनंतर पंचायत समिती परिसरात लाचखोर अधिकारी, कर्मचार्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, आष्टी शहरातील खडकत रोडवर एक मिनी अंगणवाडी आहे. त्या मिनी अंगणवाडीचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीत केले. त्यामुळे त्या अंगणवाडीला काहीशा अधिक सुविधा प्राप्त झाल्या. त्याचबरोबर तेथील अंगणवाडी ताईचे वेतन काही प्रमाणात वाढले. सदरची बाब एकात्मिक बालविकास सेवा कार्यालयातील सुपरवायझर यांना अधिकशी खटकू लागली आणि त्यांनी संबंधित अंगणवाडी ताईस पैशाची मागणी सुरू केली. तू जर आम्हाला पैसे देणार नसशील तर दिला गेलेला दर्जा खाली करून तुझं वेतन कमी करू, असे सातत्याने म्हणत राहिल्या. सरशेवटी संबंधित अंगणवाडी ताईने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या खात्याकडे रितसर तक्रार केली. ओळख परेड झाल्यानंतर आज आष्टीच्या पंचायत समितीमधील एकात्मिक बालविकास कार्यालयामध्ये त्यांनी सापळा रचला. त्या सापळ्यात सुपरवायझर अमृता श्रीकांत आष्टे व कनिष्ठ सहाय्यक निता रामदास मलदोडे या अडकल्या. त्यांना 5 हजाराची लाच घेताना रंगेहात पडण्यात आले. ही कारवाई लाचलूचपत विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम गिराम, पो. अमलदार संतोष राठोड, पो.अलमदार सुदर्शन निकाळजे व इतर दोघे जण यांनी ही कारवाई केली.