आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढला आहे. सरकार आणि विरोधी पक्ष आता कामाला लागले आहे. आचारसंहितेपूर्वीच विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच भाजपचे नेते चंद्रकात पाटील यांनी आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, Dpdc चा 99% टक्के निधी खर्च करण्यात यशस्वी झालो आहे. काही निधी खर्च करण्यासाठी वर्क ऑर्डर 31 ऑगस्टपर्यंत काढण्याच्या आदेश दिले आहेत. 112 कोटी रुपयांचा निधी आपल्याला वाढवून मिळाले आहेत. नियोजनच्या सदस्यांनी कामे सुचवण्याच्या सूचना देखील दिले आहे . 20 सप्टेंबरला आचारसहिंता लागेल हे अंदाज आहहे तसे गृहीत धरून कामं करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसहिंता लागण्याचा अंदाज आहे.