बीड (रिपोर्टर) ग्रामसेवकाच्या अंतर्गत जन्म-मृत्यूसह अन्य प्रमाणपत्र दिले जातात. प्रमाणपत्र कसे द्यायचे? याबाबत आज लोकसेवा हक्क आयुक्त जाधव यांनी ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले.
बीडच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वानखेडे, गटविकास अधिकारी सानप यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सदरील बैठकीमध्ये सर्व ग्रामसेवकांना आयुक्त जाधव यांनी मार्गदर्शन करत प्रमाणपत्राबाबत काही निर्देश दिले आहेत.