Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडवाढत्या प्रदुषणाने पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात -पाशा पटेल

वाढत्या प्रदुषणाने पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात -पाशा पटेल


जास्तीत जास्त बांबुंच्या झाडांची लागवड करा बीड (रिपोर्टर)- जगामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यामुळे प्रदुषण वाढू लागलं, वाढतं प्रदुषण माणसासाठी प्रचंड प्रमाणात हानीकारक ठरू लागलं. यावर वेळीच उपाययोजना आखल्या नाही तर भविष्यात पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा इशारा देत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त बाबूंच्या झाडांची लागवड करणे आज गरजेचे असल्याचे स्पष्ट प्रतिपादन माजी आमदार तथा कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.


बीड येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना पाशा पटेल म्हणाले की, वाहनांच्या संख्येमुळे कार्बनचे प्रमाण वाढू लागले. त्यामुळे तापमानही वाढत आहे. अमॅझॉनसारख्या जंगलांना आगी लावल्या जातात, हे जंगल जगाला २० टक्के ऑक्सीजनचा पुरवठा करते, तसेच झाडांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली, नियमानुसार ३३ टक्के झाडे असावीत, पण आज कुठे एक टक्का तर कुठे दीड टक्के इतकी झाडे दिसून येत आहेत.

आगामी काळात वातावरण झपाट्याने वाढणार असून माणसाला ऑक्सीजनचे सिलेंडर घेऊन फिरावे लागणार असल्याचा इशारा देत कमी कालावधीत लवकर वाढणारे म्हणजे बांबुचे झाड आहेत, या झाडांची लागवड जास्तीत जास्त प्रमाणात केली तर पर्यावरणामध्ये बदल घडू शकते आणि झाडांची संख्या वाढवून माणसांना त्यातून जास्तीत जास्त ऑक्सीजन मिळू शकते, असे पाशा पटेल यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!