Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeबीडजिल्हा उपनिबंधकाचे नियोजन ढिसाळ

जिल्हा उपनिबंधकाचे नियोजन ढिसाळ


दोन कि.मी.अंतरावरील जिनिंग सोडून शेतकर्‍यांना
३० कि.मी. लांबच्या जिनिंगवर कापूस घालावा लागणार
बीड (रिपोर्टर):- धारूर तालुक्यातील भोपा या ठिकाणी असलेल्या जिनिंगची क्षमता ही माजलगाव, वडवणी आणि धारूर या तीनही तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकर्‍याचा कापुस खरेदी करण्याची क्षमता आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी कापुस खरेदीची प्रक्रिया अगोदरच शेतकर्‍यांकडून नोंदणी करून नंबर प्रमाणे सुरूवात केली आहे.

जिल्ह्यात सीसीआय आणि फेडरेशन या दोन महासंघाच्या वतीने जिनिंगवरील शासकीय भावात कापुस खरेदी प्रक्रिया राबवली जाते. मात्र या सर्वांचे नियोजन जिल्हा उपनिबंधक फडणवीस यांनी केले आहे. मात्र त्यांनी केलेल्या नियोजनाचा त्रास कापुस उत्पादक शेतकर्‍याला सहन करावा लागत आहे. माजलगाव तालुक्यातील किमान १० ते १२ गावातील शेतकर्‍यांना २ ते ५ कि.मी.अंतरावर असलेल्या जिनिंग सोडून माजलगाव शहरात असलेल्या ३० कि.मी.अंतरावर असलेल्या जिनिंगवर कापुस घालावा लागणार आहे.


यावर्षी कापुस उत्पादक शेतकर्‍यांनी कापसाच्या पेर्‍याचे प्रमाणपत्र तलाठ्याकडून घेवून सात बारा आणि इतर कागदपत्रासह बाजार समितीमध्ये आपल्याकडील विक्री करावयाच्या कापसाची नोंद करायची होती. मात्र तालुक्याच्या सिमा लक्षात घेता जिल्हा उपनिबंधक फडणवीस यांनी ज्या शेतकर्‍याला जी जिनिंग जवळ पडेल अशा शेतकर्‍याचा कापुस खरेदी केला जाईल असे आश्‍वासन दिले होते.

मात्र त्यांनी हे आपले आश्‍वासन एक तर पाळले नाही, दुसरे त्यांचे कापुस खरेदीची नियोजन ढासळल्याने भोपा येथील दोन जिनिंगच्या आसपास दिंद्रुड, नित्रुड, नाकलगाव, आलापुर, बेलुरा, बाभळगाव अशी किमान पंधरा गावे या जिनिंगपासून २ ते ५ कि.मी.अंतरावर आहेत. त्यामुळे या गावातील शेतकर्‍यांना भोपा येथील जिनिंगवर कापुस घेवून गेल्यानंतर एक तर गाडी भाडे कमी लागते, वेळ कमी लागतो, माप लवकर होते. या सर्व बाबी शेतकर्‍यांच्या सोयीचे असतांना या सर्व गावातील शेतकर्‍यांना कालपासून बाजार समितीतील संदेश येवून त्यांनी आपला कापुस ३० कि.मी.अंतरावर असलेल्या माजलगाव येथे झाला होता असे आदेश काढले आहेत.

त्यामुळे या कापुस उत्पादक शेतकर्‍यातून जिल्हा उपनिबंधक यांच्या बाबतीत संताप व्यक्त केला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!