माजलगाव/आष्टी (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघामधील बहुचर्चीत आणि लक्षवेधक ठरलेल्या आष्टी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीतील काहींनी बंडखोरी करत आपण पंकजा ताईंचे उमेदवार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला मात्र पंकजा मुंडेंनी थेट माजलगाव आणि आष्टी मतदारसंघात जाहीर सभा घेत बंडखोरांना तंबी दिली आणि समर्थकांना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यामुळे विचलि असलेल्या समर्थकांना ताईंच्या आदेशामुळे दिशा मिळाली आणि आष्टीत धोंडे चितपट होत धसांचे पारडे जड झाले तर तर इकडे अपक्ष उमेदवार निर्मळ आणि बाबरी मुंडे यांचे मनसुबे धुळीस मिसळत मतदारांचा एकच वादा पुन्हा प्रकाशदादा आा घोषणा धारूर, वडवणी आणि माजलगाव तालुक्यात ऐकावयास येऊ लागले.
माजलगाव मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना अडचणीत आणण्या हेतू महायुतीचेच बाबरी मुंडे आणि निर्मळ या दोघांनी आपण पंकजा ताईंचे उमेदवार असल्याचे नेरेटिव तयार केले, त्यामुळे प्रकाश सोळंके अडचणीत येण्याची शक्यता एकीकडे बोलली जात असताना पंकजा मुंडेंनी काल-परवा माजलगावात जाहीर सभा घेत त्या अपक्षांना चांगलेच धारेवर धरले. आपल्या भाषणातून महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन करत प्रकाशदादांना पुन्हा संधी देण्याचे सांगितले. पंकजाताईंच्या समर्थकांना थेट ताईचाच आदेश आल्याने आता माजलगावमध्ये निर्मळ-बाबरीचे चांगलेच वाजल्याचे दिसून येत असून प्रकाश सोळंके यांच्याबाबत ताईंच्या सभेनंतर माहोल बदलला आहे. तर इकडे आष्टीमध्येही महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश धस असताना भाजपाचे भीमराव धोंडे यांनी उमेदवारी टाकत महायुतीचा उमेदवार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आपण पंकजा मुंडेंचा उमेदवार असल्याचा नरेटिव धोंडेंनी तयार करू पाहिला मात्र काल पंकजा मुंडेंनी आष्टी तालुक्यामध्ये काही जाहीर सभा घेतल्या आणि त्या सभेतून बंडखोरांना तंबी दिली. आपला उमेदवार हे धस अण्णा असल्याचे सांगत धसांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर असल्याचे मतदारांना स्पष्ट सांगितले. त्यामुळे आष्टी मतदारसंघात आता धसांचा विजय हा निर्णायक असल्याचे सांगण्यात येते.