बीड (रिपोर्टर): नगर रोड महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. हे काम कधी होणार? प्रश्न उपस्थित होऊ लागला. धिम्या गतीने काम होऊ लागल्याने वाहनधारकांसह नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाचे काम तात्काळ करण्यात यावे व महामार्गावरील कड्डे बुजवावे या मागणीसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या फोटोची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरती करर्यात आली आहे.
बीड शहरातून जाणार्या नगर रोड महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महामार्गाचे काम संथगतीने होत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदरील महामार्गाचे काम तात्काळ करण्यात यावे व ज्या महामार्गावर खड्डे पडलेले आहेत ते बुजण्यात यावेत या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालायासमोर काही समाज सेवकांनी आगळेवेगळे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिमेसमोर आरती करण्यात आली. हे आंदोलन गणेश ढवळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.