केज (रिपोर्टर): खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडीच्या ताब्यात असलेले वाल्मिक कराड यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे आज केजच्या न्यायालयात हजर केले असता सीआयडीने पुन्हा दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली मात्र न्यायालयाने वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लावण्याबाबतचा अर्ज सीआयडीकडून न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्यामुळे कराड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने सीआयडीने तपासकामी सुरुवातीला 15 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. तेव्हा न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. आज पुन्हा सीआयडीने न्यायालयाकडे विविध तपासासाठी वाल्मिक कराड यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. सरकारी वकील शिंदे यांनी विविध गुन्ह्यांमध्ये अधिकची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी हवी असल्याचे म्हटले होते तर कराड यांचे वकील सिद्धार्थ ठोंबरे यांनी आधीच पंधरा दिवस पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आणखी पोलीस कोठडी देणे कायद्याबाहेर आहे, हे सांगताना कर्नाटकाचा एक निकाल न्यायालयासमोर मांडला होता. त्यानुसार तब्बल एका तासाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड यांना पोलीस कोठडी न देता 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याचबरोबर सीआयडीने वाल्मिक कराड यांच्याबाबत मोक्काअंतर्गत कारवाईबाबतचा न्यायालयाला देण्यात आला. आज कराड यांनान यायालयात हजर करण्यापासून परळीत समर्तकांनी आंदोलन सुरू केले आहे. पोलीस ठाण्यासमोर कराड यांच्या मातोश्री पारुबाई कराड यांनी ठिय्या आंदोलन सुरू केला होता. दुपारी दीडच्या सुमारास पारुबाई यांची प्रकृती बिघडली, त्यांना भुवळ आली, मात्र त्या रुग्णालयात जायला तयार नव्हत्या.
मोक्का अंतर्गत गुन्हा?
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लावण्यात आल्याबाबतचे कुठलेही कागद आपल्याकडे आलेले नसल्याचे सांगत कराड यांचे वकिल सिद्धार्थ ठोंबरे यांनी मोक्काबाबत वक्तव्य केले. तर अॅड. सिद्धार्थ ठोंबरे यांनी जामनसाठीही अर्ज केला आहे.