बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांची पथकांनी महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात त्याचा शोध सुरू केला आहे. पण, अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. यामुळे आता पोलिसांनी कृष्णा आंधळे यांला वान्टेड घोषित केले आहे. त्याला शोधून देणार्याला बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.तर दुसरीकडे खंडणी प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कालपासून वाल्मीक कराड याची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला सर्दी आणि ताप आला आहे. यामुळे आता कोर्टाने उझAझ मशिन वापरण्यास कोर्टाने मंजूरी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता तपासाला आणखी वेग आला आहे.सीआयडीसह आता एसआयटीही तपास करत आहे. काही दिवसापूर्वी एसआयटीमधील अधिकारी बदलण्यात आले. काही दिवसापूर्वी वाल्मीक कराड विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता आज कोर्टाने वाल्मीक कराड याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.वाल्मीक कराड याला व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. यावेळी त्याला सर्दी आणि ताप असल्याचे समोर आले.केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली. ही हत्या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, या आरोपींना अपहरण करुन हत्या केली. ही हत्या होऊन एक महिना उलटला आहे. पण अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. सर्व आरोपींवर मकोका लावला होता. परंतु, खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याचादेखील यात सहभाग असल्याचा आरोप करत देशमुख कुटुंबाने आंदोलन केले होते. त्यानंतर कट रचल्याचा ठपका ठेवत कराडवरदेखील मकोका लावण्यात आला. एकूण नऊ आरोपींवर मकोका लागला असून, कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. मकोका लावताना सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा प्रमुख केले आहे. कराड हा सदस्य आहे.