केज , (रिपोर्टर)ः- केज नगरपंचायत अंतर्गत असणार्या अनेक नागरीकांसह व्यापार्याकडे नगर पालिकेची थकबाकी राहिली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी न.प.ने घरोघरी जावून वसूली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली.
शहरातील नागरीकांसह व्यापारी वेळेवर कर भरत नाहीत. मार्च एन्ड जवळ आला वर्षाचा हिशोब करण्यासाठी आणि नगर पंचायतचा ताळेबंद करण्यासाठी न.प.ने वसूली मोहिम हाती घेतली. प्रत्येक थकबाकी दाराच्या घरी जावून वसूली करण्याचा निर्णय नगरपंचायतने घेतला असून या वसूली पथकामध्ये अधिक्षक असद खतीब, अनिल राऊत, सुश्रांत सुर्यवंशी, रफिक कुरेशी, सय्यद अतिक यांचा समावेश आहे.










