वडवणी तालुक्यातील आगर तांड्यावर अचानक आग लागण्याच्या घटना घडत असल्याबाबतचे वृत्त सायखं. दैनिक बीड रिपोर्टरने दोन दिवसांपूर्वी प्रकाशीत केल्यानंतर या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. गावामध्ये अग्निशामक दलाच्या गाड्यांसह पोलीस बंदोबस्तात वाढ केली असून गावकर्यांनी घाबरू नये, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र गावकर्यांनी अचानक आग लागण्याच्या या घटनेचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी सायं. दैनिक बीड रिपोर्टरने वडवणी तालुक्यातील आगर तांडा या ठिकाणी अचानक आग लागल्याच्या घटनेबाबत वृत्त दिले होते. करणीकवटालासह अन्य बाबींतून सदरच्या घटना घडत असल्याची अंधश्रद्धा गावकर्यांत निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण गावात निर्माण झाले होते. हे वृत्त प्रकाशीत झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलनासह पोलीस व महसूलच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. रात्रीपासून गावामध्ये अग्निशामक दलाच्या बंबासह पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे. सदरच्या घटना कशामुळे घडतात याचा तपास सुरू आहे. (सविस्तर वृत्त पान आठवर)