बीड (रिपोर्टर): महादेव मुंडे हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची मागणी केली होती, याबाबत आता बीड पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. या प्रकरणाच्या तापासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसापूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी एसआयटी किंवा सीआयडीची मागणी केली होती. महादेव मुंडे यांचा परळी तहसीला कार्यालयासमोर खून झाला होता. या हत्येला आता 15 महिने उलटले आहेत. पण, अजूनही आरोपी मोकाटच आहेत. या प्रकरणी आरोपींच्या अटकेच्या अनेकवेळा मागणी केली होती, पण पोलिसांनी कारवाई केली नव्हती. पण, आता जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. यामुळे आता या प्रकरणाच्या तापासाला गती येणार असल्याचे बोलले जात आहे.
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पथक स्थापन केले असून या पत्रकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल चा समावेश असणार आहे .एलसीबी चे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हत्येला 14 महिने उलटले परळी येथील तहसील कार्यालयासमोर सायंकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास महादेव मुंडे यांची हत्या झाली. 14 महिने उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. या प्रकरणाच्या तापासात आतापर्यंत चार अधिकारी बदलले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी अनेकवेळा पोलिसांकडे मागणी केली पण, अजूनही या प्रकरणाचा तपास लागलेला नाही. दरम्यान, आता काही दिवसापूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एसआयटी किंवा सीआयडीची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली नाही तर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता