वडवणी (रिपोर्टर):- १४ वर्षाची शाळकरी मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात आसताना एका तरुणाने तिला रस्त्यात आडवून घरी घेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आहे. हि घटना चिखलबीड येथे घडली असून पिडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन गांवातीलच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि, वडवणी तालुक्यातील मौजे चिखलबीड येथील १४ वर्षीय शाळकरी मुलगी दि.१४ रोजी शाळेतून घरी येत आसताना रस्त्यामध्येच गांवतील इसम मनोज वसंत तांदळे यांने आडवे येत हाताला धरुन मुलीला घरी नेले. आणि घरातच अंगाला झटत बळजबरीने बलात्कार केला. तेव्हा पिडित शाळकरी मुलीने आरडा ओरडा केला तेव्हा आरोपीने पळ काढला. झालेला सर्व प्रकार आजी आणि आईला सांगितला तेव्हा वडवणी पोलीसात धाव घेत झालेला प्रकार सांगितला आणि पिडित अल्पवयीन शाळकरी मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी मनोज वसंत तांदळे यांच्या विरोधात गु.र.नं. ३३/२०२५ कलम ६४,६५ बीएनएस सह कलम ४,८,१२ बालकांचे अपराधापासून संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास सपोनि भोसले हे करत आहेत. तर यातील आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.