केज (रिपोर्टर): कांद्याच्या पिकामध्ये केज तालुक्यातील कळंबअंबा येथील एका शेतकर्याने अफुची लागवड केली होती. अफुच्या लागवडीची गुप्त माहिती युसुफवडगाव पोलिसांना झाल्यानंतर काल पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून साडेचार किलो अफू जप्त केला. या अफुची किंमत 1 लाख 72 हजार रुपये इतकी आहे. अफुची लागवड करणार्या शेतकर्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या काही वर्षांपूर्वी धारूर तालुक्यातील काही शेतकर्यांनी अफुची लागवड केली होती. हे प्रकरण राज्यभर चर्चीले गेले होते.
उत्तम रंगनाथ मस्के (रा. कळंबअंबा) या शेतकर्याने कांद्याची लागवड केली होती. या कांद्याच्या लागवडीत त्याने अफुची देखील लागवड केली होती. या घटनेची गुप्त माहिती युसुफवडगाव पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी काल त्याठिकाणी धाड याकून साडेचार किलो अफु जप्त केला. या अफुची किंमत 1 लाख 72 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी उत्तम मस्के यास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई नायब तहसीलदार आशा वाघ, पोलीस निरीक्षक शेंडगे, सय्यद अमजद, शिनगारे, घोरपडे, महादेव, राऊत, डोंगरे, चालक गायकवाड यांनी केली.