नेकनूर(रिपोर्टर)ः- सोलापूर जिल्हयातल्या मोहोळ तालुक्यात दरोडे, वाटमारी, लूटमार करणारे कुख्यात दरोडेखोर बीड जिल्ह्यात डेरेदाखल झाल्याची माहिती सोलापूरच्या गुन्हा अन्वेशन विभागाला होती. त्यांचा पाठलाग करत आज सकाळी सोलापूर एलसीबी पथक हे केजपर्यंत आले तेव्हा दरोडे खोरांची गाडी नेकनूरच्या दिशेने निघाली असता सोलापूर पोलीसांनी नेकनूर पोलीसांशी संपर्क साधला असता तेव्हा स्थानीक पोलीसांनी नेकनूरच्या नुरानी चौकात नाकाबंदी केली. त्याचवेळी दरोडेखोरांची गाडी भरधाव वेगात नुरानी चौकात आली. पोलीसांनी सिनेस्टाईल त्यांची धरपकड करत दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतले हा सर्व थरार आज सकाळी दहा च्या सुमारास नेकनूरच्या मुख्य रस्त्यावर पहावयास मिळाला यावेळी बघ्यानी मोठी गर्दी केली होती. संबधीत दोन्ही दरोडेखोर बीड जिल्हयातलेच असल्याचे सुत्राचे सांगणे आहे.

या बाबत असे की, सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यामध्ये दरोडा, वाटमारी, चोरी, लुटमार करणारे दरोडेखोर बीडच्या दिशेने गाडी क्र.एम.एच 22 ए.एम.3446 ने सोलापूर पोलीसांना हुलकावनी देत निघाले होते. मात्र सोलापूर एलसीबीचे एक पथक त्यांच्या मागावर सुरवातीपासून होते. आज सकाळी या दरोडेखोरांची गाडी केज येथे आली त्यांच्या पाठीमागे सोलापूर पोलीस होतीच. दरोडेखोर नेकनूरच्या दिशेने निघाले तेव्हा सोलापूुर पोलासांनी नेकनूर पोलीसांशी संपर्क साधून दरोडेखोरांची माहिती दिली. त्यावेळी नुरानी चौकात पोलीसांनी नाकाबंदी करत तिनही दिशेला जाणार्या रस्त्यावर कुठे वाहने आडवी ठेवली, तर कुठे अन्य अडथळे निर्माण केले. त्यावेळी भरधाव वेगात दरोडेखोरांची गाडी आली. त्यांनी समोर नाकाबंदी आणि अडथळे पाहीतले. त्याच वेळी दबाधरुन बसलेल्या नेकनूर पोलीसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. सदरची कारवाई आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नेकनूरच्या मुख्य रस्त्यावर केली गेली. ही कारवाई होतांना मोठ्या संख्येने बघे उपस्थित होते. त्यांना आवरतांना पोलीसांच्या नाकी नऊ आले होते. मात्र नेकनूर पोलीसांनी तो जमाव आवरत दरोडे खोरांच्या मुसक्या बांधल्या. सदरचे कर्तव्य नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, पोलीस नाईक सचीन वंजारे, पोलीस अमलदार बाळासाहेब ढाकणे, सय्यद अब्दुला, सहाय्यक उपनिरीक्षक रेखा मॅडम, पो.कॉ. आशा चौरे, होमगार्ड, मुतजीब आतार यांनी केली. नंतर पकडलेल्या दरोडेखोरांना सोलापूर पोलीसांच्या हवाले केले.